ज्या वेळी चेहरा नव्हता ‘ त्या ‘ वेळच्या आठवणी

आज मी सतीश चाफेकर आहे…..कंस्ट्रक्शन कंपनीमधील साईटवरची नोकरी म्हणजे कुठेलच बंधन नसायचे , फक्त हुक आणि क्रूक काम करणे आणि कंपनीचे कमीतकमी नुकसान करणे. तेथे हे माझे काम नाहीं हा रुबाब नाही. रुबाब केला की संध्याकाळी घरी बसा , हल्ली सरकारी खात्यात , बँकेमध्ये हे माझे काम नाही सांगितले की मोकळे, अरे आपण दोन ते अडीच हजार रुपये दिवसाला कमवतो याचाही कुणीही विचार करत नाही आपल्याला जी ऑर्गनायझेशन पगार देते तितके आपण काम करतो का ह्याचा विचारही केला जात नाही. फक्त सवलती हव्यात त्यामुळेच हे पब्लिक स्केटर घाट्यात गेले आणि खाजगीकरणाचे वारे सुरु झाले.परंतु कंस्ट्रक्शन कंपनीमध्ये हे चोचले कधीच नसतात. मला आठवतंय आमचे काम चेंबूरच्या माहुल गावातील समुद्रात चालले होते , मांडीभर चिखलात पायलिंग करून टॉवर उभारण्याचे काम चालू होते , ओहोटी आल्यावर मांडीभर चिखलात उतरावे लागणार होते मी हाफ चड्डी घालून इतरांबरोबर चिखलात घुसलो , घट्ट चिखल असल्यामुळे चपला , गमबूट घालणे अशक्यच . पायाला खाली खेकड्यांचा आणि बोचऱ्या कातळाचा स्पर्श होत होता , तितक्यात मी मागे पाहिले आमचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. पटेल पण चिखलातून येऊ लागले , मी म्हणालो साब आप , तशी माझ्यावर खेकसले , ‘ तू , तू जा सकता , मै क्यू नाही , आगे चल ……’ मी चूप . डॉ . पटेल भडकले की त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडत नसत.अक्षरशः गुढगा भर चिखलातुनकाळात चालत माहुल येथुं टाटा च्या हद्दीत जात असू , खाली तळपायाला खेकडे आहेत हे जाणवत होते. पण आम्ही बिन्धास चालत असू. लाज लज्जा वगैरे काही नाही , सगळे गुंडाळून ठेवलेले होते अशा अनेक गोष्टीमुळे कुठलेही काम किंवा प्रॉब्लेम आला तर नाही म्हणायचे नाही ,त्यातून मार्ग काढायचा असतो हे शिकलो. कारण नीट प्रत्यन केले तर काहीही अशक्य नसते हे त्याच वेळी समजले होते.
डॉ. पटेल आपल्यावर भडकावेत म्हणून अनेक प्रयत्न करत असत , कारण ते ज्याच्यावर भडकले की त्याचे खऱ्या अर्थाने कल्याण होत असे कारण तो माणूस त्यांच्या लक्षात रहात असे आणि पगारवाढ वगैरे पुढे आलीच. आमच्या इथे एक कॉन्ट्रॅक्टर होता , त्याने काही चूक केली तेव्हा डॉक्टारांनी त्यांना असा एकदाच हाणला , त्याचा दातच पडला , पण त्याला पुढे डॉक्टरांनी सोन्याचा दात लावून दिला , तो अभिमानाने तो प्रसंग सोन्याचा दात दाखवून सर्व कथा सांगत असे. तो कंपनीचा लाईफ मेंबर झाला. आता कुठे आहे ते माहित नाही.आमच्या डॉ. पटेल यांच्यामुळे मी एकच शिकलो ते म्हणजे जगात काहीही अशक्य नाही आणि आज मी जो काही आहे, ती जिद्द माझ्याकडे डॉक्टर पटेल यांच्याकडून आली , त्यांचे वडील शेतकरी होते , पण ते खूप हुशार , बस एक प्रसंग त्याच्या आयुष्यात असा घडलं आणि यांनी मिळालेल्या संधीचे सोने केले , डायरेक्ट मिशीगन विद्यपीठात गेले आणि डॉक्टरेट घेऊन तेथे न रहाता , भारतात आले आणि स्वतःचा व्यवसाय जिद्दीने सुरु केला आणि यश मिळवले, आणि दुसरे म्हणजे त्यांच्याकडे परफेक्ट ‘ टायमिंग ‘ होते .त्यांच्याकडे एखादी गोष्ट करण्याचे टायमिंग होते . ते बरोबर टायमिंग साधून कंपनीमध्ये , त्याच्या कारभारामध्ये वाढ करत असत. त्यांनी कधी खोटी कामे केली नाहीत , क्लायंटला कधी त्यांनी फसवले नाही . क्लायंट त्यांच्यावर खुश असे कारण काम चोख होत असे. त्यांच्याकडून जिद्द आणि टायमिंग मी शिकलो .
आज डॉक्टर पटेल यांनी ९० हून अधिक वर्षाचे आहेत , अजून फिट आहेत , आमच्या बॉस अनिल परुळकर यांच्या मुलीच्या लग्नात भेटले एक ते दीड वर्षांपूर्वी , तेव्हा डॉ. पटेल यांच्याबरोबर हिंमत करून सेल्फी काढला होता. आता हे अनिल परुळकर कोण …ते आपण पुढे बघू …

 606 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.