डोंबिवलीत कायापालट अभियानास प्रारंभ

महापौरांसह आयुक्तांचाही सहभाग

डोंबिवली : येथिल इंदिरा चौक ते गांधीनगर नाल्यापर्यन्त कायापालट अभियानाचा प्रारंभ महापौर विनिता राणे, आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांचे प्रमुख उपस्थितीत झाला. महापौर विनिता राणे ,आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे, मनसे गटनेते मंदार हळबे, भाजप नगरसेविका खुशबू चौधरी, नगरसेवक मुकुंद पेडणेकर, संदीप पुराणिक, तसेच पालिका उपायुक्त मिलींद धाट, उमाकांत गायकवाड, पल्लवी भागवत, घनकचरा विभागाचे सहा. आयुक्त गणेश बोराडे, सहा.सार्व.आरोग्य अधिकारी विलास जोशी, वसंत डेगलुरकर तसेच महापालिकेचे अनेक अधिकारी आणि कर्मचारी यांनी प्रत्यक्ष हातात झाडू घेऊन कायापालट अभियानास हातभार लावला.
रस्त्यावर साफसफाई करत असतानाच पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी रस्त्यावर उपस्थित नागरिकांशी संवाद साधून, त्यांची गाऱ्हाणी ऐकन संबधित अधिकाऱ्यांना त्याप्रमाणे कार्यवाही करण्याचे त्यांनी निर्देश दिलेत. आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी मानपाडा रस्त्यावरील नाना नानी पार्कला भेट देऊन तेथे आवश्यक त्या सुधारणा करण्याचे निर्देश मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव यांना दिले. रस्त्यावरील पेवर ब्लॉकची दुरुस्ती करणे, डेब्रिज उचलणे या बाबतच्या सूचनाही त्यांनी संबधित अधिकाऱ्याना दिल्या. कल्याण डोंबिवली स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी महापालिकेबरोबरच नागरिकांचीही असून त्यांनीही या अभियानात सहभाग घ्यावा असे आवाहन आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी यावेळी केले.

 567 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.