दिव्याच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार

माजी आमदार सुभाष भोईर यांच्या हस्ते दळवी नगर येथील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

दिवा : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील दिवा विभागाकरिता मोठ्या प्रमाणावर पायाभूत सोई सुविधांसाठी निधी मंजूर झाला असून हि सर्व कामे योग्य रीतीने मार्गी लावण्यासाठी आणि दिवा विभागाच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याची भावना माजी आमदार सुभाष भोईर यांनी व्यक्त केली. सदाशिव दळवी नगर, श्लोक नगर व शांती नगर येथे आमदार निधीतून ५० लक्ष रुपये कामाच्या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले कि, दिवा विभागातील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी कल्याणफाटा येथून एमआयडीसीच्या मुख्य जलवाहिनीवरून दिवा व साबे विभागाकरिता १६.५ कोटी रुपये खर्चाची नवीन जलवाहिनी टाकण्यात येणार असून दोन ते तीन महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल. त्यानंतर दिव्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघणार आहे. याशिवाय ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून दिवा विभागासाठी इतरही अनेक कामे मंजूर असून ती पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी कल्याण ग्रामीण विधानसभा संघटक ब्रम्हाशेठ पाटील, नगरसेवक शैलेश पाटील, विभागप्रमुख भालचंद्र भगत, अरुण म्हात्रे, सीताराम नाईक, भाजप दिवा शीळ मंडळ सरचिटणीस रोहिदास मुंडे, शाखाप्रमुख वनेश दळवी, सुनील कांबळे, नवनीत पाटील, अनिल भगत, श्याम काठे, विश्वनाथ पाटील, अभिषेक ठाकूर, समीर पाटील, वायंगणकर यांच्यासह मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी, महिला उपस्थित होत्या.

 528 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.