झेडपी आरोग्य विभागासह मलेरीया विभागातील कर्मचारी संपात सहभागी

विविध मागण्यासाठी पुण्यात धरणे आंदोलन

ठाणे : आरोग्य कर्मचाऱ्यांचे ऑनलाईन गुगल सिट व गुणांक पध्दतीचे परिपत्रक रद्द करावे, अरोग्य कर्मचारी यांचे सेवा प्रवेश नियमात संघटनेस विश्‍वासात घेतल्या शिवाय सेवा प्रवेश नियमाचा प्रस्ताव शासनास सादर न होणे आदी विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने पुणे येथे बेमुदत धरणे आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनात ठाणे झेडपीच्या आरोग्य विभागातील व मलेरीया विभागातील सुमारे ५०० कर्मचारी सहभागी झाले आहे.
आरोग्य विभागात सातत्याने आरोग्य सेवेपेक्षा संगणकीय कामाला महत्व दिले जात असल्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्यसेवेचे महत्व काही अधिकारी वर्ग कमी करत आहे का? अशी शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचारी यांच्यामध्ये शासनाच्या विरोधात असंतोष निर्माण झाला आहे. त्यात आरोग्य कर्मचारी यांच्यातून पदोन्नतीने भरण्यात येणारी आरोग्य सहा ही पदे पुर्वीप्रमाणे पदोन्नतीने भरण्यात यावी, अरोग्य कर्मचार्‍यांच्या कामाचे तास निश्‍चित होणे, अरोग्य कर्मचारी यांच्या पदाची शैक्षणिक अर्हता बदलणे आदी मागण्यांसदर्बात महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने पुणे येथे मंगळवार ३ मार्चपासून बेमुदत धरणे आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनात ठाणे झेडपीच्या आरोग्य विभागातील व मलेरीया विभागातील सुमारे ५०० कर्मचारी सहभागी झाले असल्याची माहिती संघटनेचे अमर तायडे यांनी दिली.

 544 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.