समाजसेविका काशीबाई जाधव यांना कोकणस्थ समाजरत्न पुरस्कार प्रदान

डोंबिवली : गरीब महिलांना न्याय मिळवून देणाऱ्या,पोलिसांना सतत मदत करणाऱ्या डोंबिवलीतील समाजसेविका काशीबाई जाधव यांना कोकणस्थ समाजरत्न २०२० पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. मुंबईतील कांदिवली येथील आधाभवन येथे मासिक कोकणस्थ समाजभूषण आणि समाजरत्न पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.मुंबई महानगर पालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध अभिनेत्री अनुराधा राजाध्यक्ष यांच्या हस्ते जाधव यांना पुरस्कार देण्यात आला. समाजसेविका काशीबाई जाधव यांच्या समाजसेवेची दाखल घेऊन आजवर अनेक संस्थांनी त्यांना पुरस्कार प्रदान केले.अनेक राजकीय पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळीनीही त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.

 435 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.