एन्काऊंटर स्पेशालिस्ट परमबीर सिंग मुंबई पोलीस आयुक्तपदी

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यात सिंग यांनी दिली होती क्लिनचिट

मुंबई : मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून संजय बर्वे निवृत्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक परमबीर सिंग यांचीमुंबई पोलीस आयुक्तपदी वर्णी लागली आहे. परमबीर सिंग हे जून २०२२ पर्यंत यांचा आयुक्त पदावर कार्यरत राहणार आहे. एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून सिंग यांची ओळख असून ते १९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत . गेली अनेक वर्षे वेगवेगळ्या सरकारमधील नेत्यांशी चांगले संबंध आहेत.
परमबीर सिंग यांनी ठाण्याचे आयुक्त म्हणूनही काम पाहिले होते. त्यांच्याच कार्यकाळात अंडरवर्ल्ड डॉन दाउद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला ठाणे खंडणी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या होत्या. त्यानंतर त्यांना राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कायदा व सुव्यस्थेचा यापदी नेमण्यात आले.अतिरिक्त पोलीस महासंचालक असताना कोरेगाव भीमा प्रकरणात त्यांनी स्वतः लक्ष घालत हे प्रकरण हाताळले होते. गेल्यावर्षीच त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून नेमण्यात आले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यात क्लिनचिट सिंग यांनीच दिली होती. अखेर परमबीर सिंग यांच्या गळ्यात मुंबईच्या आयुक्तपदाची माळ पडलेली आहे.

 758 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.