इंटकच्या वतीने गोविंद कबाडे यांचा सत्कार


ठाणे : एसटी महामंडळाच्या प्रदिर्घ सेवेतून ठाणे विभागाचे यंत्र अभियंता गोविंद कबाडे हे आज २९ फेब्रुवारी ला सेवानिवृत्त झाले . वर्षभरापुर्वीच औरंगाबाद मध्यवर्ती कार्यशाळेतून त्यांची ठाणे विभागात बदली झाली होती .. अगदी तळागाळातून बढती घेत कबाडे हे यंत्र अभियंता या उच्चपदावर पोहचले होते .महाराष्ट्रातील एसटी च्या अनेक विभागात त्यांनी अधिकारी म्हणून एसटी ची सेवा केलेली होती ..विभागीय कार्यालय व कार्यशाळेच्या वतीने कबाडे साहेबांचा सत्कार विभागातील मान्यवर अधिकारी वर्गाच्या उपस्थितीत करण्यात आला ..
महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस नी एसटी ची प्रतीमा असलेली फ्रेम भेट देण्यात आली ..युनियन चे कार्याध्यक्ष शामराव.भोईर व प्रसिध्दी सचिव रत्नपाल जाधव यांनी हा यथोचित सत्कार केला याप्रसंगी विभागाचे विभागनियंत्रक भालेराव उपस्थित होते ..

 510 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.