स्वरसंध्या गीतांच्या कार्यक्रमाला डोंबिवलीकर रसिकांचा उत्फूर्त प्रतिसाद

मराठी भाषा दिनानिमित्त मनसे विभाग क्रमांक ४ च्या वतीने करण्यात आले होते आयोजन

डोंबिवली : कविवर्य वि.वा.शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा जन्मदिन हा जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. या मराठी भाषा दिनानिमित्त मनसे विभाग क्र.४ डोंबिवली शहराच्या वतीने स्वरसंध्या मराठी वाद्यवृंदाचा कार्यक्रम पूर्वेकडील शिवमंदिर रोड येथील ज्ञानेश्वर मठ मैदानात संपन्न झाला. या कार्यक्रमात सुरेल मराठी भावगीतांचा कार्यक्रमात डोंबिवलीकरांनी गर्दी करून उत्फूर्त प्रतिसाद दिला. शहर संघटक संजीव ताम्हणे आणि मनसे विभाग सचिव गिरीश देसाई, मिलिंद म्हात्रे या कार्यक्रमाचे यांनी आयोजन केले होते. यावेळी समीर करंबेळकर,शाखा अध्यक्ष समीर भोर आदींनी खूप मेहनत घेतली.

मनसे उपाध्यक्ष तथा डोंबिवली शहरअध्यक्ष राजेश कदम यासह राहुल कामत, गटनेते मंदार हळबे गटनेते परिवहन समितीचे माजी सदस्य प्रल्हाद म्हात्रे, मनवीसे डोंबिवली शहराध्यक्ष समीर जेधे, डोंबिवली महिला शहरअध्यक्ष मंदा पाटील. महिला पदाधिकारी दीपिका पेडणेकर,संदेश प्रभूदेसाई,सिद्धार्थ मार्तोंडकर अदिसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गायक ओमकार प्रभूघाटे,गायिका विद्या शिवलिंग,काश्मीरा राईलकर, तबलाकार शशिकांत राईलकर, निवेदक सुनीलकुमार चोरगे, ढोलकीवादक कमलाकर मेस्त्री,मनोज शिवलिंग, गिटारिस्ट दर्शन शाह यांनी सुरेख मराठी गीते गाऊन रसिक श्रोत्यांची मने जिंकली.सूर तेच छेडीता,ऐरणीच्या देवा तुला यासारखी आजरामर मराठी गीते गायल्यावर रसिका श्रोत्यांनी टाळ्याच्या कडकडात दाद दिली.गायक गीते गात असताना उपस्थित डोंबिवलीकरांनी हा क्षण आपल्या मोबाईल मध्ये रेकाॅर्ड केले. यावेळी मनसेने राबविलेल्या मराठी सह्यांच्या मोहिमेलाही डोंबिवलीकरांनी भरभरून प्रतिसाद दिला.मराठी भाषेतून सह्या करण्यासाठी जेष्ठ नागरिकांनीहि गर्दी केली होती.यावेळी पत्रकार अजित मांढरे यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

 648 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.