इमारतीच्या टेरेसला लागलेली आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश

जीवितहानी नाही, मोठा अनर्थ टळला

ठाणे : ठाण्यातील नौपाडा येथील भगवती स्कूल जवळील सोहम ट्रॉपिकल युनिट या तळमजलासह २२ मजली इमारतीच्या मचान व टेरेसला लागलेली आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या पथकाला यश आले असून या घटनेत कोणतेही जीवितहानी झालेली नाही. सध्या येथील परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आहे.

आज दुपारी ठाणे महापालिका क्षेत्रातील नौपाडा येथील भगवती स्कूल जवळील सोहम ट्रॉपिकल युनिट या तळमजलासह २२ मजली इमारतीच्या संपूर्ण मचान आणि टेरेसला अचानक आग लागली.टेरेसवर काही लाकडी सामान असल्याने आगीने चांगलीच पेट घेतली. ठाणे महानापलिकेच्या अग्निशमन विभागाला माहिती मिळताच पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
ठाणे महापालिकेच्या अग्निशमन च्या ताफ्यात नवीन ब्रांटो फायर लाईडर असून सुद्धा त्याचा काहीच उपयोग झाला नाही करण लाईडर तिथं पर्यंत पोहचूच शकली नाही अग्निशमन विभाग कडे २५ ते ३० मजली बिल्डिंगला लागलेली आग विझवण्यासाठी कोणतीच यंत्रणा नसल्याचे आज प्रकर्षाने जाणवू लागले आहे ठाणे शहरात नवनवीन उंचीच्या उंच तयार होणाऱ्या बिल्डिंग मधील राहिवासीयांच्या जीवाशी ठाणे महापालिका खेळत असल्याचे ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते संतोष साटम हे बोलत होते.

आग विझवण्यासाठी ५ अग्निशमन मशीन, २ बचाव वाहन, ४ जंबो पाणी टँकर, ४ पाणी टँकर , १ ब्रांटो वाहन, १ टीटीएल वाहन, १ रुग्णवाहिका आणि एकूण १९ अग्निशमन वाहने यांच्या साहाय्याने सदरची आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.

 578 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.