सिग्नल शाळा शिक्षण क्षेत्रातील धाडसी पाऊल

डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांचे प्रतिपादन

ठाणे: शिक्षण हक्क कायदा व सर्व शिक्षा अभियानासारख्या शासकीय कार्यक्रमानंतरही काही समूह शिक्षणाच्या परिघाबाहेर राहत होता. सिग्नल शाळा हे शिक्षण क्षेत्रातील धाडसी पाऊल म्हणावे लागेल. सिग्नल शाळेने शिक्षणाचा परीघ मोठा करत वंचित घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले, रोबेटीक लॅबसारख्या आधुनिक सुविधा सिग्नल शाळेत उभ्या राहत आहेत. एक दिवस मुख्य धारेच्या शाळेतील मुले सिग्नल शाळेत प्रवेशासाठी येतील असा विश्वास खासदार डॉ. खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी येथे व्यक्त केला. सिग्नल शाळेतील रोबेटीक लॅब उद्‍घाटन कार्यक्रमात उद् घाटक म्हणून ते बोलत होते.

देशभरात अंत्योदयासाठी विविध उपक्रम राबवले जातात. ठाण्यातील सिग्नल शाळा नुकतीच अंत्योदय बेस्ट प्रॅक्टीस म्हणून निवडण्यात आली. शिक्षण हक्क कायदा व सर्व शिक्षा अभियानासारख्या शासकीय कार्यक्रमानंतरही शिक्षणापासून वंचीत राहिलेल्या मुलांना सिग्नल शाळेमुळे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येता आले. संगणक कक्ष, सुसज्ज प्रयोगशाळा, अद्ययावत क्रिडांगण व आता तंत्रकुशल रोबेटीक लॅब अशा आधुनिक सुविधा सिग्नल शाळेत उभ्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एक दिवस मुख्य धारेतील शाळेतील मुलं सिग्नल शाळेत प्रवेशासाठी येतील. ठाणे महानगरपालिका सिग्नल शाळेच्या मागे भक्कमपणे उभी आहे. म्हणूनच समर्थ भारत व्यासपीठसारख्या संस्थांना हा प्रयोग यशस्वी करता आला. असे प्रतीपादन खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी सिग्नल शाळेतील रोबेटीक लॅबच्या उद्‍घाटनप्रसंगी केले.

ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. केंद्र, राज्य स्तरावरील अनेकजण ठाणे महानगरपालिकेतील पथदर्थी प्रकल्प पाहण्यासाठी येतात. सिग्नल शाळा देखील शिक्षण विभागाचा असाच अभिनव प्रकल्प आहे. महापौर या नात्याने अशा प्रकल्पांच्या मागे पालिका सदैव उभी राहिल असा विश्वास महापौर नरेश म्हस्के यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोलताना केला.

पालिका शाळेतील मुलांचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी आम्ही कटीबद्ध असू. सिग्नल शाळेच्या यशामुळे ठाण्याची मान उंचावली गेली आहे. सिग्नल शाळेसारख्याच सुविधा पालिकेच्या सर्व शाळांमध्ये उभ्या केल्या जातील असे आश्वासन शिक्षण विभाग सभापती विकास रेपाळे यांनी या वेळी केले.

एसबीआय लाईफ इश्युरन्स कंपनीने सिग्नल शाळेला रोबेटीक लॅब उभी करून देत असताना एक प्रकारे देशाच्या पुढील पिढीच्या भवितव्याचे इश्युरन्स काढल्यासारखे आहे. सिग्नल शाळेचा प्रयोग ठाण्यासोबतच राज्य व देशपातळीवर मोठ्या प्रमाणावर राबविला जावा त्याला एसबीआय लाईफ इश्युरन्स सर्वतोपरी साहाय्य करेल असा विश्वास एसबीआय लाईफ इश्युरन्स कंपनीचे आयटी आणि इंटरनॅशनल बीझनेस ऑपरेशन प्रेसीडंट आनंद पेजावर यांनी यावेळी व्यक्त केला.

रोबेटीक लॅबच्या माध्यमातून सिग्नल शाळेतील पहिली ते दहावीच्या मुलांना रोबेटीक प्रोग्रॅमिंग हार्डवेअर व सॉफ्टवेअरचे ज्ञान मिळणार असून प्रत्यक्ष रोबो बनविण्याची संधी देखील मुलांना यामुळे मिळणार आहे. कार्यक्रमाला समर्थ भारत व्यासपीठाचे संचालक उल्हास कार्ले, व्हॅल्युएबल ग्रुपचे संचालक प्रफुल वैद्य, शंशाक प्रधान आदी मान्यवर उपस्थित होते.

 447 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.