श्री समर्थ, विद्यार्थी संघाला अजिंक्यपद

हर्ष कामतेकर व प्रणाली मेंढी स्पर्धेत सर्वोत्कृष्ट

किशोर व किशोरी मुंबई जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धा

मुंबई : लायन्स क्लब ऑफ माहीम व मुंबई खो-खो संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थी क्रीडा केंद्रच्या विशेष सहकार्याने खेळवण्यात आलेल्या किशोर-किशोरी गटाच्या मुंबई जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत किशोरी गटात श्री समर्थ व्यायाम मंदिराने आणि किशोर गटात विद्यार्थी क्रीडा केंद्राने बाजी मारली. परळच्या लाल मैदानात रंगलेल्या या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात बोलताना माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. अर्मायटी कुपर यांनी खो खोच्या चुरशीच्या लढतीचे कौतुकाने उल्लेख करत अंतिम सामन्याच्या लढतीत त्या गुंग होत हरवून गेल्याचा उल्लेख करत लायन्स क्लब ऑफ माहीमच्या या उपक्रमाचा अभिमान वाटतो असे गौरवाने उल्लेख केला.

किशोरी गटाच्या अतितटीच्या अंतिम सामन्यात श्री समर्थ व्यायाम मंदिराने अमर हिंद मंडळाचा ०४-०२ (०२-०१-०२-०१) असा २ गुणांनी पराभव केला. मध्यंतराला घेतलेली एक गुणांची आघाडी श्री समर्थने नेटाने टिकवली व विजेतेपद मिळवले. श्री समर्थकडून खेळताना प्रणाली मेंढीने नाबाद २:१०, ५:१० मिनिटे संरक्षणकेले व आक्रमणात १ खेळाडू बाद केला. तर आकांक्षा कोकाशने नाबाद ४:५०, नाबाद १:४० मिनिटे संरक्षण केले. मधुरा मालपने आक्रमणात २ खेळाडू बाद केले. अमर हिंद तर्फे रुद्रा नाटेकरने नाबाद ५:१० नाबाद ५:०० मिनिटे संरक्षण केले. निधी पेडणेकरने १:००, १:२० मिनिटे संरक्षण करत चांगला खेळ केला.
किशोर गटाच्या रोमहर्षक अंतिम सामन्यात विद्यार्थी क्रीडा केंद्राने युवक क्रीडा मंडळाचा ११-०८ (०२-०२ व ०४-०४ व ०५-०२) असाजादा डावात ३ गुणांनी पराभव केला. सामना मध्यंतराला २-२ असा असताना दुसऱ्या डावात ४ गुण विद्यार्थीने मिळवत सामना जिंकला असे वाटत असताना युवकांच्या छोट्याखानी आक्रमकांनी ४ गुण टिपत सामना बरोबरीत नेला. मात्र जादा डावात विद्यार्थीने आक्रमणाची धार वाढवत सामना जिंकला. विद्यार्थी तर्फे खेळताना हर्ष कामतेकरने ५:२०, २:१० मिनिटे संरक्षण करून अष्टपैलू खेळ केला. जनार्दन सावंतने आक्रमणात २ गडी बाद केले. अथर्व पालवने १:१०, ४:३० मिनिटे संरक्षणकरून आक्रमणात १ गडी बाद केला. युवक कडून खेळताना ओंकार घवाळीने नाबाद ३:५०, २:४० मिनिटे संरक्षणकेले. राज सुर्वेने १:४०, १:३० मिनिटे संरक्षण करत १ गडी बाद केला. अमित पालने १:३०, १:०० मिनिटे संरक्षण केले व आक्रमणात १ गडी बाद केला.
किशोर गटाच्या तृतीय क्रमांकाच्या सामन्यात ओम समर्थ व्यायाम मंदिराने अमर हिंद मंडळाचा ०८-०२ असा ६ गुणांनी पराभव केला तर किशोरी गटाच्या तृतीय क्रमांकाच्या सामन्यात ओम साईश्वरने सरस्वती मंदिर हायस्कूलचा ०२-०१ असा १ गुण २ मिनिटे राखून पराभव केला. स्पर्धतील विजेत्यांना पाच हजार, उपविजेत्यांना तीन हजार तर उपांत्य पराभूत संघांना दोन-दोन हजार व चषक देऊन गौरवण्यात आले. .
स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू

                  

अष्टपैलू खेळाडू : हर्ष कामतेकर (विद्यार्थी क्रीडा केंद्र) प्रणाली मेंढी (श्री समर्थ व्यायाम मंदिर)

सर्वोकृष्ट संरक्षक : ओंकार घवाळी (युवक क्रीडा मंडळ) रुद्रा नाटेकर (अमर हिंद मंडळ)

सर्वोकृष्ट आक्रमक : जनार्दन सावंत (विद्यार्थी क्रीडा केंद्र) मधुरा मालप (श्री समर्थ व्यायाम मंदिर)

 475 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.