अजय, ललितची अर्धशतके

चॅलेंज स्पोर्ट्स क्लबचा मोठा विजय


ठाणे : अजय जैस्वाल, ललित गुंडोळकर आणि जय चव्हाणच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर चॅलेंज स्पोर्ट्स क्लबने रायझिंग क्रिकेट क्लबचा १४७ धावांनी दणदणीत पराभव करत ज्ञानराज स्पोर्ट्स कमिटी (डीएससीए) आयोजित मर्यादित षटकांच्या लीग क्रिकेट स्पर्धेत विजयी आगेकूच केली. प्रथम फलंदाजीच्या करताना अजय जैस्वाल (७७), ललित गुंडोळकर (६७) आणि जय चव्हाणच्या ४३ धावांच्या खेळीमुळे चॅलेंज स्पोर्ट्स क्लबने ४० षटकात आठ विकेट्सच्या मोबदल्यात ३३७ धावांचा डोंगर रचला. प्रतीक महानवारचा अपवाद वगळता रायझिंग संघाच्या इतर गोलंदाजांना फारसा प्रभाव पाडता आला नाही. प्र्तिकने ६३ धावात तीन विकेट्स मिळवल्या. या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना रायझिंग क्रिकेट क्लबचा डाव २७ व्या षटकात १९० धावांवर आटोपला. पराभूत संघाच्या उत्कर्ष हजारे (३२) आणि हेरंब साळवीने २९ धावा करत किल्ला लढवला. संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब करताना केतन घरत, अजिंक्य कदम, अमनकुमार आणि अजय जैस्वालने प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या. अष्टपैलू खेळ करणाऱ्या अजयला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला.

 528 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.