कल्याण पूर्व भागात आता अखंडित वीजपुरवठा

शिवसेनेच्या पाठवुराव्यामुळे मेट्रो माॅलजवळ नवे उपकेंद्र होणार

डोंबिवली : सोनारपाडा ते कल्याण पूर्व पर्यंत असलेल्या भागात वीज पुरवठा सतत खंडित होत असल्याने येथील नागरिक त्रस्त आहेत.हेलक्षात घेऊन शिवसेना सतत मेट्रो माॅलजवळ उपकेंद्र उभारण्यासाठी पाठपुरावा करत होती. त्याला महावितरण कंपनीने अखेर मान्यता दिली. सध्या भूमिगत केबल टाकन्याचे काम सुरू असून यामुळे त्रस्त नागरिकांना अखंडित वीज पुरवठा मिळणार आहे. सध्या या भागात वीज पुरवठा करणाऱ्या केबल्स तारापूर येथून प्रीमियर कंपनीच्या वीज उपकेंद्रामार्फत येतात व वीज पुरवठा होतो. तारापूर येथून वीज पुरवठा होईपर्यंत वारंवार वीज खंडित होण्याच्या घटना घडत असतात. येथील नागरिकांनी ही बाब स्थानिक शिवसेना खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचेकडे नेली. त्यांनी महावितरण कंपनीच्या अधिकार्याशी चर्चा केली. मेट्रो माॅलजवळ उपकेंद्र निर्माण करावे अशी मागणी केली. महावितरण कंपनीने याला मान्यता दिली.

उपकेंद्र उभारण्यासाठी भूमिगत केबल टाकण्यास सुरुवात केली. सध्या चक्की नाक्यापर्यंत भूमिगत केबल टाकन्याचे काम पूर्ण झाले आहे. चक्की नाका ते मेट्रो मॉल हे ४.८ कि.मी. पर्यंत मार्गावर भूमीगत केबल टाकन्यासाठी महावितरण कंपनीने कल्याण डोंबिवली महापालिकेकडे अर्ज केला असून त्यासाठी फी पण जमा केली आहे. पण वारंवार आठवण करूनही पालिका परवानगी देण्यास तयार नाही अशी तक्रार अधिकारी करत आहेत. याची दखल घेऊन खा. डॉ. शिंदे यांनी आयुक्तांना पत्र लिहून नागरिकांना अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी भूमिगत वीज पुरवठा करण्यासाठी परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे. मात्र या बाबत एका अधिकाऱ्याने कल्याण शीळ रोडवर काम करण्यासाठी पालिकेला अधिकार नाही मात्र आयुक्त आपल्या अधिकारात परवानगी देण्याचा अधिकार आहे असे सांगितले.

 389 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.