आता एक धाव आश्रम शाळेच्या पाण्यासाठी

डोंबिवली प्राईड रन` मॅरेथॉन मधून मिळणार मदत …

भारतीय लष्करातील अधिकारीहि धावणार

डोंबिवली : देशाला प्रगतीकडे नेण्यासाठी सरकार आणि प्रशासन एकीकडे जोरदार प्रयत्न करणार असल्याचे सांगत असताना आजही विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात नेत असताना त्यांना मात्र मुबलक पाण्यासाठी २ ते ३ किलोमीटर लांब वणवण करावी लागत आहे.या वास्तविकतेकडे सरकारने जरी कानाडोळा केला असला तरी सामाजिक संस्था यासाठी प्रयत्न करत असताना दिसतात. शहापूर पासून ४० किलोमीटर चिध्यांची वाडी येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यानाची हि स्थिती पाहून रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्टने यासाठी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला.डोंबिवली प्राईड रन मेरेथाॅनच्या माध्यामातून जमा झालेला निधी या प्रकल्पाकरिता खर्च होणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. मेरेथाॅनमध्ये या भारतीय लष्करातील २० अधिकारीहि धावणार आहे.

   रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट अध्यक्षा दिपाली पाठक, सदस्य विनोद देशपांडे, डीआरएम प्रोजेक्ट अध्यक्ष दिलीप भगत, रणबन  प्रोजेक्ट इंव्हेट देवेंद्र माने, रोजेन्सी ग्रुप डायरेक्टर विकी रूपचंदानी आदींनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.दिलीप भगत आणि देवेंद्र माने यांनी `डोंबिवली प्राईद रन` मॅरेथॉनचा उद्देश थोडक्यात शब्दात सांगितला.अध्यक्षा दिपाली पाठक यांनी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्टच्या आजवरच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.सदस्य विनोद देशपांडे यांनी चिध्यांची वाडी येथील आश्रमशाळेची सविस्तर माहिती दिली.आदिवासी पाड्यातील मुलांना शिक्षण मिळावे म्हणून राष्ट्रीय शिक्षण संस्था, डोंबिवलीने शासनाच्या परवानगीने १ फेब्रेवारी १९९९ रोजी फुगाळे, ता. शहापूर, जिल्हा ठाणे या गावी स्वामी विवेकानंद आदिवासी आश्रमशाळा या नावाने शाळा सुरु केली. सुरुवातीला २६ विद्यार्थी शाळेत शिकत होते. शाळेची छोटी इमारत होती. जून २००४ पासून शाळेचे स्थलांतर चिंध्याची वाडी ता.शहापूर येथे करण्यात आले. सध्या या शाळेत ४०० विद्यार्थी शिकत आहेत.शाळेच्या सुरुवातीला एक विहीर आणि बोअरवेल होती. मात्र विद्यार्थ्याची संख्या वाढल्याने विहीर आणि बोअरवेल कमी पडत आहे. पावसाळ्यात विहिरीला पाणी असल्याने चार महिने पाण्याचा प्रश्न सूटतो. त्यानंतर मुबलक पाण्याची सोय होत होती. परंतु आंघोळीसाठी आणि कपडे धुण्यासाठी विद्यार्थ्यांना २ ते ३ किलो मीटर लांब छोट्याश्या ओढ्यात जावे लागत. पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न निकाली लावण्यासाठी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट यांनी प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली. डॉ.उमेश मुंडले यांच्या सल्लानुसार भूजलपातळी  वाढविण्यासाठी पाच वेगवेगळ्या प्रकल्पाची माहिती संस्थेला देण्यात आली. यासाठी ४५ लाख रुपये खर्च होणार आहे. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली यांनी १ मार्च रोजी सकाळी ६ वाजता रिजन्सी ग्रुप डोंबिवली प्राईड रन मॅरेथॉन आयोजित केली आहे.यात २५०० स्पर्धक धावणार असून भारतीय लष्करातील २० जवान धावणार आहेत. यातून जमा झालेल्या निधीतून प्रकल्पात खर्च केली जाणार आहे.

 445 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.