डोंबिवलीतही आता पाईप लाईनद्वारे गॅसपुरवठा

शिवसेनेने केला होता पाठपुरावा


डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदार संघातील सर्व नागरिकांना घरा-घरात गॅॅस देण्याचे वचन शिवसेनेने दिले होते .त्याप्रमाणे निवासी भागात गॅॅस पुरवठा यापूर्वीच सुरूही झाला आहे. आता डोंबिवलीकरांना घरा घरात गॅॅस पुरवठा अयोध्या नगरी भागातून शुभारंभ झाला. सध्या अनेक भागात गॅॅस पुरवठा करणारी केबल टाकण्याचे काम पण सुरू आहे.
डोंबिवली शहरात गॅॅस पोहोचवण्यासाठी भूमिगत पाईप लाईन टाकण्याचे काम प्रशासनामुळे रखडले होते. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी याचा सतत पाठपुरावा केला. त्यामुळे आता सर्व अडथळे दूर झाले असून डोंबिवलीकरांना घरा-घरात गॅॅस पुरवठा देण्याचे स्वप्न पूर्ण होणार असून शिवसेना उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ व शहरप्रमुख राजेश मोरे यांच्या उपस्थितीत अयोध्या नगरी भागात गैस पुरवठा सुरू करण्याचा शुभारंभ आज संपन्न झाला. घरडा सर्कल ते मंजुनाथ पर्यंत ७५० मीटर लांब भूमिगत पाईप लाईन टाकण्याचे कामाला परवानगी मिळावी म्हणून कंपनीने पालिकेशी पत्रव्यवहार सुरू केला प्रशासनाने रस्ते खोदाई साठी सुमारे पावणेदोण कोटी रुपये २०१८ मध्ये जमा केले होते शिवसेनेने सतत जो पाठपुरावा केला त्याला यश आले असून सर्वच डोंबिवलीकरांना घराघरात गॅॅस लवकरच मिळणार आहे.

 524 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.