शहर स्वच्छतेसाठी पालिका आयुक्तांचे कायापालट अभियान

डोंबिवली :  कायापालट अभियानाअंतर्गत खडकपाडा ते बिर्ला कॉलेज रस्त्यावर सुरू करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत पालिका  आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, महापौर विनिता राणे, नगरसेवक आणि पालिका अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी स्वतः हातात झाडू घेऊन रस्त्याची सफाई केली .या दरम्याम फुटपाथ, विद्युत खांब, हे साफ करण्यात आले.  

     पालिका आयुक्त पदाचा कार्यभार हाती घेताच आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शहर स्वच्छतेला प्राधान्य देत  महापालिका क्षेत्रात अनेक उपक्रम राबविण्यास सुरवात केली आहे. महानगरपालिका क्षेत्राअंतर्गत मुख्य रस्ते, चौक, पदपथ नागरिकांसाठी स्वच्छ व सुंदर बनविण्याच्या दृष्टीकोनातून महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेनुसार पालिका प्रशासनाने कायापालट अभियान सुरू केले आहे.सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कल्याण पश्चिमेकडील  खडकपाडा सर्कल ते संदीप हॉटेल (बिर्ला कॉलेज रोड) या रस्त्यावर   कायापालट अभियान राबविण्यास सुरुवात करण्यात आली.या स्वच्छता मोहिमेत स्वतः आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, महापौर विनिता राणे, नगरसेवक आणि पालिका अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी स्वतः हातात झाडू घेऊन रस्त्याची सफाई केली  .या अभियानाअंतर्गत महापालिका कर्मचा-यांमार्फत सदर रस्त्यांवर संपूर्णतः साफसफाई, दुभाजकांची रंगरंगोटी, पदपथ रंगविणे ,होर्डिंग हटवणे इत्यादी कामे हाती घेण्‍यात येणार आहेत

 391 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.