उत्कर्ष, बंड्या मारुती, गोल्फादेवीची आगेकूच

शिवशंकर उत्सव मंडळ आयोजित राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धा २०१९ -२०

मुंबई : शिवशंकर उत्सव मंडळाच्या राज्यस्तरीय प्रथम श्रेणी कबड्डी स्पर्धेतील साखळी सामन्यात मुंबई शहरच्या उत्कर्ष क्रीडा मंडळाने पालघरच्या श्रीराम क्रीडा मंडळाचा ३३ -२६ असा ०७ गुणांनी धुवा उडवला. या सामन्यात उत्कर्ष क्रीडा मंडळाच्या अक्षय परब व घाडीगावकरने उत्कृष्ट चढाया केल्या तर सागर घारेने चांगल्या पकडी करून संघाला विजय मिळवून दिला तर श्रीराम क्रीडा मंडळाच्या नरेश धिंदळेने व सुरज रिंगेने लढायांमध्ये आपली कमाल केली तर पकडी करताना तेजस शिरसाटने प्रेक्षकांची वाहवा मिळवली.सुरुवातीला ही स्पर्धा साखळी पद्धतीने व नंतर बाद पद्धतीने खेळवली जाणार आहे. एकूण आठ गटात संघांची विभागणी केलेली आहे.
दुसऱ्या सामन्यात बंड्या मारुती सेवा मंडळाने वाशिमच्या जय बजरंग क्रीडा मंडलाचा ३८ -३३ असा पाच गुणांनी पराभव केला बंड्या मारुतीच्या विनोद अत्याळकरने उत्कृष्ट चढाया केल्या तर पकड करताना निलेश पवार व जितेश सापने प्रेक्षकांकडून वाहवा मिळविली. तर पराभूत जय बजरंगच्या राजू कथोरे व अस्लम इनामदार व अमोल साळुंखेने चमकदार खेळ केला.
गोल्फादेवीने सत्यम क्रीडा मंडळ मुंबई उपनगरचा ४१ -२४ असा १७ गुणांनी दणदणीत पराभव केला. गोल्फादेवीच्या सचिन पाताडे व सुमित साळुंखेने उत्कृष्ट चढाया केल्या तर तुषार दुमनेने पकडी मध्ये कमाल दाखवली. पराभूत सत्यमच्या सिद्धेश पिंपरे व दिनेश रामाणे यांनी चांगला खेळ केला.
भिवंडीच्या मोरया संघाने शिवशक्ती मंडळाचा ३७ -१८ असा धुव्वा उडवला मोरयाच्या दीपक शिंदे व मकरंद मसुरकर यांनी चढाई व फक्कड करताना बहारदार खेळ केला तर पराभूत शिवशक्तीच्या चैतन्य माळी व विकी उगले यांनी जोरदार लढत देण्याचा प्रयत्न केला.

 408 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.