मराठी भाषा संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी

अप्पर जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांचे प्रतिपादन

ठाणे : मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करणे आपल्या प्रत्येकाची जबाबदारी असुन प्रत्येकांनी मराठी भाषेचा आग्रह धरणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांनी केले.

जेष्ठ कवी वि.वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो या दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृह मध्ये अप्पर जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांनी मराठी भाषा दिनाची प्रतिज्ञा दिली.या वेळी निवासी उप जिल्हाधिकारी शिवाजी पाटील, तहसिलदार सर्वसाधारण राजाराम तवटे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना वैदेही रानडे म्हणाल्या की,भाषा हे केवळ आपल्या बोलण्याचे माध्यम नसुन भाषा हे आपले ज्ञान ग्रहणाचे माध्यम आहे.दैनदिन वापरात जी भाषा वापरतो तिच्या विषयी आपल्या मनात आदर आसणे आवश्यक आहे.ज्ञान मिळवण्यासाठी प्रत्येक भाषा आवश्यक आहे.इंग्रजी माध्यमाचा आग्रह धरताना मराठी भाषेकडे दुर्लश करता कामा नये.असे ही त्यांनी सांगितले.

यावेळी उपस्थितांना रानडे यांनी प्रतिज्ञा दिली.महाराष्ट्र माझे राज्य आहे.मराठी माझी राजभाषा आहे.माझ्या भाषेवर माझे प्रेम आहे.समृध्द आणि विविधांगी साहित्य परंपरा असलेल्या मराठी भाषेचा मला अभिमान आहे.मी माझ्या भाषेचा मान ठेवीन आणि मराठी भाषेतच बोलेन.माझ्या मराठी भाषेशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे.

  

 402 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.