२५२ स्पर्धकांच्या सहभागाने ठाणे महापौर चषक जिम्नॅस्टीक स्पर्धेला प्रारंभ

दोन दिवस रंगणार स्पर्धा
ठाणे : रिबन, बॉल, क्रॉसफिटबार, बॅलन्सबीम, वॉल्ट आदींचा वापर करत स्पर्धकांनी सादर केलेली नेत्रदीपक अशा प्रात्याक्षिकांनी ठाणे महापौर चषक जिम्नॅस्टीक स्पर्धेला आज प्रारंभ झाला. महापौर नरेश म्हस्के यांनी सर्व स्पर्धकांना स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपमहापौर पल्लवी कदम, सभागृह नेते अशोक वैती, क्रीडा अधिकारी मीनल पालांडे आदी उपस्थीत होते.
ठाणे महानगरपालिका व ठाणे जिल्हा जिम्नॅस्टीक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आर्यक्रीडा मंडळ, गांवदेवी व सरस्वती सेकंडरी स्कूल नौपाडा येथे आज करण्यात आले. या स्पर्धेसाठी एकूण २५२ स्पर्धकांनी आपली नोंदणी केली आहे.
आज सकाळी या स्पर्धेला सुरूवात करण्यात आली. आर्टीस्टीक व रिदमीक जिम्नॅस्टीक या प्रकारातील चित्तथरारक अशी प्रेक्षकांना जागेवर स्तब्ध करणारी प्रात्याक्षिके स्पर्धकांनी सादर केली. ही स्पर्धा दोनदिवस असून स्पर्धेचा पारितो षिक वितरण सोहळा उद्या शुक्रवार २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ८.३० वा. सरस्वती सेकंडरी स्कूल येथे होणार आहे.

शपथ मराठीतच घेतली पाहिजे : महापौर नरेश म्हस्के

जिम्नॅस्टीक स्पर्धा सुरू होण्यासाठी स्पर्धेच्यानियम व अटी मान्य असल्याबाबतची शपथ ही सर्व खेळाडूंना ठाणेजिल्हा जिम्नॅस्टीक असोसिएशनच्या वतीने देण्यात येत होती. परंतु ही शपथ इंग्रजीमधून देत असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांच्या निदर्शनास आले. आज मराठी भाषादिन असून ही शपथ इंग्रजी भाषेतून न देता मराठी भाषेतूनच देण्यात यावी असे संघटनेस सूचीत केले. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होताच निवेदक राजेंद्र पाटणकर यांनी सर्व खेळाडूंना जाहीरपणे मराठीतून शपथ दिली. यापुढे कोणत्याही स्पर्धेदरम्यान देण्यात येणारी शपथ ही मराठीतूनच असली पाहिजे असे आदेश यावेळी महापौर यांनी क्रीडाविभागाला व संघटनेला दिले आहेत.

 409 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.