व्हर्टिकल गार्डन उभारून केले सुशोभीकरण

बदलापूर : रस्त्याच्या दोन्ही बाजूला व्हर्टिकल गार्डन उभारून सुशोभीकरण केल्याने जाणाऱ्या येणाऱ्यांचे मन प्रसन्न वाटते. तब्ब्ल चारशे कुंड्यांमध्ये विविध रंगीबेरंगी झाडांची सजावट करण्यात आली आहे. फुल झाडं न लावता शोभिवंत झाडे लावून हि कायापालट स्थानिक नगरसेवक किरण भोईर यांनी केल्याने त्यांचे कौतुक होत आहे.
पश्चिमेकडील रंजन सोसायटी जवळून एक नाला वाहतो. या नाल्यालालागून एक रस्ता आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या संरक्षक भिंतीवर हे व्हर्टिकल गार्डन किरण भोईर यांनी स्वखर्चातून उभारले आहे. काल रविवारच्या मुहूर्तावर स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते औपचारिक उदघाटन करून लोकार्पण करण्यात आले.
हे व्हर्टिकल गार्डन उभारताना विविध प्रकारची रंगीबेरंगी झाडे लावली आहेत. यात फुल झाडे लावली नाहीत, याचे कारण फुल झाडे लावली तर जाता येतांना फुल तोडून नेताना झाडाची कुंडीही चोरून नेण्याची शक्यता असल्याने फुल झाडं लावली नसल्याचे किरण भोईर यांनी सांगितले. संरक्षक भिंतीवर हे उभारल्याने रस्त्याची सुंदरता वाढली असल्याचेही भोईर म्हणाले.

 471 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.