अंकित तिवारीची अष्टपैलू चमक


चार विकेट्ससह नाबाद २३ धावांची केली खेळी


ठाणे : अंकित तिवारीच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर युनियन क्रिकेट क्लबने रायझिंग क्रिकेट क्लबचा सात विकेट्सनी पराभव करत ज्ञानराज स्पोर्ट्स कमिटी (डीएससीए) आयोजित मर्यादित षटकांच्या लीग क्रिकेट स्पर्धेत विजयी आगेकूच केली. रायझिंग क्रिकेट क्लबने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय त्यांच्यासाठी फायदेशीर ठरला नाही. अंकित तिवारी आणि मित समानीच्या अचूक गोलंदाजीपुढे त्यांना ३३ शतकात केवळ १११ धावा करता आल्या. त्यांच्या श्रावणने ३२ आणि प्रतिकने १५ धावा केल्या. अंकितला तोलामोलाची साथ देताना मित समानीने १३ धावात तीन विकेट्स मिळवल्या. या मर्यादित आव्हानाचा पाठलाग करताना मिलन रायमांझीचे अर्धशतक आणि अंकितच्या उपयुक्त फलंदाजीमुळे युनियन क्रिकेट क्लबने २० व्या षटकात तीन विकेट्सच्या मोबदल्यात ११५ धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केले. अंकितला या सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
इतर सामन्याचे निकाल :
जय भोलेनाथ क्रिकेट क्लब : २० षटकात सर्वबाद ६५ ( प्रणव धनावडे २०, कमल पास्सी २/६, वेदांत कांबळे ३/१८ , यश चव्हाण ३/४, राहुल पहाडिया २/०) पराभूत विरुद्ध सीजीएसटी : ८ षटकात ३ बाद ६८ (वेदांत कांबळे नाबाद ३१, अखिलेश कुमार १५, कैलास पाटील १/२७) मॅन ऑफ द मॅच – यश चव्हाण, सीजीएसटी ७ विकेट्सनी विजयी.

 522 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.