डोंबिवलीचा भोपाळ होण्याची कल्पना भ्रामक

जनतेने घाबरू नये, कामा संघटनेचे आवाहन

डोंबिवली : मेट्रोपोलीटन एक्झिम प्रा.लि.या रासायनिक कंपनीला लागेलेल्या भीषण आगीनंतर डोंबिवलीसह ठाणे जिल्हात चर्चेला उधाण आले होते.या घटनेनंतर अनेक राजकीय पक्षांनी आणि काही नागरिकांनी डोंबिवलीचा भोपाळ करू नकाअशी अनाठायी भीती व्यक्त केली होती.यावर डोंबिवलीचा भोपाळ होण्याची कल्पना भ्रामक आहे. येथील कंपन्यांमध्ये गॅस बनवला जात नाही. त्यामुळे जनतेला घाबरण्याचे काहीही कारण नाही. असे आवाहन कामा संघटनेने केले. डोंबिवली पत्रकार संघाच्या वतीने आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते.
डोंबिवली पत्रकार संघाच्या वतीने कल्याण- अंबरनाथ मॅन्युफॅक्चर्र असोसियेशन ( कामा संघटना ) सोबत संघटनेच्या कार्यालयात वार्तालाप आयोजित करण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष देवेन सोनी यांसह माजी अध्यक्ष श्रीकांत जोशी,उपाध्यक्ष नारायण टेकाडे,सचिव राजू बैलूर, खजिनदार डॉ. निखील धूत, बाबाजी चौधरी, मार्चचे अध्यक्ष बाबजी चौधरी,आदि पदाधिकारी उपस्थित होते. मेट्रोट्रोपोलीटन एक्झिम प्रा.लि.च्या मालकाला अद्याप कंपनी निरीक्षक आग कशी लागली याची चौकशी करत आहेत. या कंपनीला आग लागल्यानंतर कंपनीतील ट्रान्सफोर्मारच्या शेजारी असलेला डिझेलच्या ट्रमला आग लागून तो फुटला. त्याचे लाल गोळा आकाशात उडाला होता. मात्र त्या गंभीर स्वरूप दिले गेले.मंत्रालयात उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या बैठकीत कंपन्याचे स्थलांतर हा मार्ग नसल्याचे स्पष्ट केले आहे. औद्योगिक भागापासून निवासी भाग ५०० मीटर्स लांब असावा व बफर झोन निवासी करावा अशी मागणी कामा संघटनेने केली. या कंपनीबाबत सुरक्षतेची काळजी घेत आहोत.याबाबतची माहिती मंत्र्यांना दिली आहे.औद्योगील क्षेत्रात आगी लागण्याचे प्रकार होतात.या इतर समस्यांसाठी कार्यक्षम यंत्रणा उभी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीलवकरच भेट घेणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर तीन स्थरावरील कंपन्याच्या वर्गीकरणाच्या सर्वेक्षनाचे काम सुरु आहे.

स्थानिक अग्निशामक विभाग कार्यक्षम
जिल्हाधिकाऱ्यांच्या तिमाही बैठकीत स्थानिक अग्निशामक विभाग अत्यंत अकार्यक्षम असल्याची तक्रार केली आहे. रसायनिक कंपण्यातील कामगार आणी अधिकरी वर्गाचा प्रात्यक्षिक सह्भाग असलेले मोब ड्रीम ( रंगीत तालीम ) केली जाते. त्याप्रमाणे इमेज्न्सी कंट्रोल सिस्टम सुरु करण्यात आली. पाचशे करोड आर्थिक व्यवहार असलेल्या मेट्रोपोलीटन एक्झिम प्रा.लि.या रासायनिक कंपनी थोडक्या विम्या साठी कशाला आगी लावून घेईल असे अध्यक्ष देवेन सोनी यांनी सांगितले. अतिरंजित बात्न्या प्रसिद्ध करून नागरिकांना भयभीत करू नये, शहानिशा करूनच बातम्या द्याव्यात असे माध्यमांना कामा संघटनेच्या वतीने यावेळी सांगण्यात आले. प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या संकेत स्थळावर प्रदूषणाबद्दल २० टक्केच तक्रारी आहेत. तर इतर प्रदुषणाचे प्रमाण जास्त आहे.

तर न्यायालयात जाण्याचा इशारा
डोंबिवली औद्योगिक विभागात एकूण ५५० कंपन्या आहेत. यातील १२५ रासायनिक कंपन्या,१२८ कापड उत्पादक कंपन्या बाकी इतर कंपन्या आहेत. यातील १२५ रासायनिक कंपन्यांमध्ये ५० हजार कामगार काम करतात. पाच रासायनिक कंपन्याचे स्थलांतर झाल्यासकंपनीत काम करणाऱ्या कामगार बेरोजगार होतील याचा सरकारने विचार केला पाहिजे. एमआयडीसीने ९९ वर्षाच्या करारावर कंपन्यान जागा भाड्याने दिली आहे. सरकारने जर येथील पाच कंपन्याच्या स्थलांतर करण्याचा आदेश दिला तर या आदेशाविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागू असे संघटनेचे माजी अध्यक्ष श्रीकांत जोशी यांनी यावेळी सांगितले.

 434 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.