रिक्षाचालकांनी रोखली प्रवाश्यांची वाट…

वाहतूक पोलीस आणि आरटीओचे दुर्लक्ष

डोंबिवली : डोंबिवली शहरात काही बेशिस्त रिक्षाचालकांनी वाहतुकीचे नियम मोडले असताना त्यांच्यावर वाहतूक पोलीस आणि आरटीओ कारवाई करत नसल्याचा आरोप डोंबिवलीकरांकडून होत आहे. अनधिकृत रिक्षा थांबे नेमके कुठे आहे हे आरटीओ सांगण्यास तयार नसताना दुसरीकडे रिक्षाचालकांनी स्टेशनच्या प्रवेशद्वाराबाहेर रिक्षा उभ्या केल्या जातात.या रिक्षाचालकांवर वाहतूक पोलीस आणि आरटीओचे कारवाई केली जात नसल्याने नागरिक संतापले आहेत.डोंबिवली पश्चिमेकडील मधल्या रेल्वे पुलाबाहेर रिक्षाचालकांनी उभ्या ककरत असल्याने दररोज नागरिकांबरोबर हुज्जत घातली जाते.


आरटीओने अधिकृत थांबे जाहीर करावेत
अनेक महिन्यांपासून डोंबिवली पश्चिमेकडील मधल्या रेल्वे पुलाबाहेर मुजोर रिक्षाचालक अनधिकृतपणे रिक्षा थांबा केला आहे. प्रवाश्यांना रेल्वे स्थानकाबाहेर पडताना रिक्षांच्या बाजूने जावे लागते.काही वेळेस प्रवाशी आणि रिक्षाचालक यांच्यात वाद होतो.प्रवाशांनी अशा रिक्षाचालकांच्या रिक्षा नंबर वाहतूक पोलिसांना द्यावा असे आवाहन केले आहे. मात्र तक्रार करूनही वाहतूक पोलीस का कारवाई करत नाही असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. या ठिकाणी चार दिवसांपूर्वी एका महिला पत्रकाराला रिक्षाचा धक्का लागल्यावर रिक्षाचालकाला जाब विचारला. रिक्षाचालकाने वाहतूक पोलीस आमच्यावर कारवाई करणार नाही असे उद्धटपणे बोलल्यावर उपस्थित नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. यावरून वाहतूक पोलीस मुजोर रिक्षाचालकांसमोर हतबल झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.आरटीओने डोंबिवली शहरातील अधिकृत रिक्षा थांब्याची माहिती जनतेसमोर सांगावी अशी मागणी केली आहेत आहे.

 615 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.