ठाणे (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाने मध्यवर्ती कार्यालयात आयोजित केलेल्या दाखले वाटप शिबिराला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. अवघ्या एकाच दिवसात सुमारे 537 जणांनी विविध दाखल्यांसाठी आपले अर्ज दाखल केले आहेत. या सर्वांना येत्या दोन ते चार दिवसात दाखल्यांचे वितरण करण्यात येणार आहे.
दहावी – बारावीचे निकाल लागले आहेत. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांची आवश्यकता भासणार आहे. हे दाखले एकाच छताखाली आणि एकाच वेळी मिळावेत यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार राष्ट्रीय सरचिटणीस. डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी सबंध शहरभर शनिवार – रविवारी दाखले वाटप शिबिरे आयोजित केली आहेत. त्याचा शुभारंभ पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातील आजच्या शिबिराने झाला.
या मोफत दाखले वाटप शिबिरामध्ये रहिवास दाखला, अधिवास दाखला (डोमेसाईल), ज्येष्ठ नागरिक दाखला, उत्पन्न दाखले यांचे करण्यात आले. या शिबिराचा सुमारे 537 जणांनी लाभ घेतला. यावेळी विविध चाचण्या करुन तहसीलदार कार्यालयाच्या वतीने या सर्वांना दाखले देण्यात येणार आहेत.






यावेळी मनोज प्रधान म्हणाले की, विविध दाखले मिळविण्यासाठी नागरिकांना तहसीलदार कार्यालयात पायपीट करावी लागत असते. मात्र, हे दाखले वेळेवर मिळत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सबंध शहरभर असे शिबिर आयोजित करण्यात येत आहेत. या शिबिरात आम्ही नागरिकांना विनाशुल्क दाखले प्रदान करीत आहोत. अशा पद्धतीच्या शिबिरांमुळे नागरिकांना एकाच छताखाली विविध दाखले मिळणार आहेत. शनिवारी पहिले शिबिर पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात पार पडले असून त्यास अभूतपूर्व प्रतिसाद लाभला आहे. आता पुढील शिबिरे वागळे इस्टेट, घोडबंदर, नौपाडा आदी भागात आयोजित करण्यात येणार आहेत.
यावेळी, जिल्हा युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, प्रशासन सरचिटणीस राजेश साटम, गजानन चौधरी, आशिष उमासरे, मिलिंद बनकर, माधुरी सोनार, मेघना शेट्टी, शशिकला पुजारी, कुळविंदर सिंग सोखी, विश्वास चव्हाण, शिवा कालू सिंह, एकनाथ जाधव, भिकाजी कदम, जगत सिंह परोचा, बालेश हत्तिंबिरे, सचिन भातबरे, राजेश मिश्रा, निलेश जाधव, सरदार गुरअशिश सिंग बुमरा, श्रीकांत बर्वे, संदेश गमरे, ज्योती गमरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
5,390 total views, 1 views today