प्रदूषणमुक्त दिवाळीचा संदेश देत सायकल प्रेमींनी केली सायकल राईड

शनिवारी सकाळी दिवाळी निमित्त ठाणे – घाटकोपर – ठाणे या मार्गावर सायकल राईड आयोजित केली होती.

ठाणे: दिवसेंदिवस वाढत चाललेले प्रदूषण पाहता सर्वच सण उत्सव पर्यावरणस्नेही साजरे व्हावे यासाठी सर्व पर्यावरण प्रेमी आवाहन करत असताना याच पार्श्भूमीवर प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करा हा संदेश देण्यासाठी आम्ही cycle प्रेमी फाउंडेशनच्यावतीने ‘चला पर्यावरण स्नेही दिवाळी साजरी करूया’ या सायकल राईडचे आयोजन केले होते.
शनिवारी सकाळी दिवाळी निमित्त ठाणे – घाटकोपर – ठाणे या मार्गावर सायकल राईड आयोजित केली होती. या राईडचे नेतृत्व संस्थेचे सेक्रेटरी दीपेश दळवी, प्रा. सुनील भुसारा, गजानन दांगट, संकेत सोमणे यांनी केले. राईड झाल्यानंतर सर्व सायकल प्रेमींनी दिवाळीच्या फराळाचा आस्वाद घेतला. विभक्त कुटुंबामुळे हल्ली एकत्र येऊन फराळ करणे ही संकल्पनाच मागे पडली आहे. त्यामुळे एकमेकांमधला संवाद देखील हरवत चालला आहे. यानिमित्ताने सर्व सायकल प्रेमी एकत्र येऊन फराळ करतील आणि सायकल या विषयावर विचारांची देवाण-घेवाण होईल या उद्देशाने सायकल राईड आणि त्यानंतर दिवाळी फराळचे आयोजन केले असल्याची माहिती संस्थेच्या संस्थापिका – अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे यांनी दिली. निवृत्तीनंतर ज्येष्ठ सायकल प्रेमींनी टुरिंग राईड करत जीवनाचा आनंद घ्यावा अशी माहिती सायकलमध्ये विश्व विक्रम करणारे सतीश जाधव यांनी दिली. यात कल्याण, ठाणे, मुंबई हून सायकल प्रेमी सहभागी झाले होते. पोळी भाजी केंद्राचे संचालक प्रशांत ठोसर यांच्याकडून दिवाळी फराळ सर्व सायकल प्रेमींना देण्यात आला तर ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठानचे डॉ. राजेश मढवी यांनी जागेची व्यवस्था केली होती.

 125,238 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.