यंदाही स्वातंत्र्यवीर सावरकरनगर येथे होणार `कोकण महोत्सव’ 

१९ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या महोत्सवात विविध कार्यक्रम, खाद्यपदार्थ यांची रेलचेल.

ठाणे : एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या मार्गदर्शनाखाली, शिवसेना स्वातंत्र्यवीर सावरकरनगर व बारटक्के फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण महोत्सव-२०२३' हा कार्यक्रम १९ ते २६ नोव्हेंबर पर्यंत दररोज सायंकाळी ५ ते रात्री १० वा. या वेळेत ठामपा शाळा क्रमांक १२० चे पटांगण, स्वातंत्र्यवीर सावरकरनगर येथे संपन्न होणार आहे. माजी शिवसेना गटनेते व माजी नगरसेवक दिलीप बारटक्के यांनी या महोत्सवाचे आयोजन केले आहे. यंदा कोकण महोत्सवाचे १६ वे वर्ष आहे, अशी माहिती आयोजक दिलीप बारटक्के यांनी पत्रकार परिषदेत दिली. गेली ८०० वर्षे दशावतार ही कोकणातील लोकसंस्कृती आणि परंपरा असून, ती जपण्यासाठी महाराष्ट्रात ठाण्यातील स्वातंत्र्यवीर सावरकरनगर येथे गेली १५ वर्षे सातत्याने कोकण महोत्सव होत आहे. यंदा एकूण १६ कार्यक्रम असणाऱ्या कोकण महोत्सवात कोकणातील प्रसिध्द दशावतार नाट्य मंडळींची ५ पारंपारिक दशावतार नाटके दहिकाले, महिलांसाठी खेळ पैठणीचा, कवी संमेलन, कोकणरत्न पुरस्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, आदिवासी नृत्य, मुलांसाठी फनफेअर. नृत्य स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, महिलांसाठी पाककला स्पर्धा आदि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. तसेच विविध प्रकारचे खाद्य स्टॉल यामध्ये कोकणातील झणझणीत म्हावरा, मालवणी मसाले, स्वादिष्ट खडखडे लाडू, मालवणी खाजा, कुळदाची पिठी, सुकी मच्छी, कोकम, काजू शा प्रकारचे व्यावसायिक व शासकीय स्टॉलचा समावेश असेल. कोकण महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे यावर्षी कोकणातील देव मंदिर वारसा म्हणून श्री क्षेत्र भरणे खेड येथीलश्री काळकाई देवी’ मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. 
रविवार १९ नोव्हेंबर सायं. ५  ते ७  – कोकण महोत्सव शुभारंभ, प्राणप्रतिष्ठा स्थापना, महाभारत, हनुमान चालीसा, अथर्वशीर्ष पठण, आई जगदंबे मराठी परफॉर्मन्स. रात्री ७ ते १० – श्री कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ बाबी कलिंगण प्रस्तुत नाटक. 
सोमवार २० नोव्हेंबर ५  ते ७ – आदिवासी तारफा नृत्य क्रांतिसूर्य बिरसा मुंडा निंबापूर. रात्री ७ ते १० – पारंपारिक नृत्याचा नजराणा वारसा माझ्या महाराष्ट्राचा' सेलिब्रिटी गौरी पवार, बिनधास्त गर्ल मंगळवार २१ नोव्हेंबर ५ ते ७ - वेशभूषा स्पर्धा, रात्री ७ ते १० जय हनुमान पारंपारिक दशावतार शरद मोचेमाडकर बुधवार २२ नोव्हेंबर ४ ते ७ - पाककलास्पर्धा, एकात्मिक बाल विकास प्रकल्प शासनाचा विविध योजना माहिती, सही पोषण देश रोशन स्पर्धा, बेटी पढाव बेटी बचाव जनजागृती अभियान, रात्री ७ ते १० - पैठणी कार्यक्रम - सुप्रसिद्ध विनोदी कलाकार जितू दादा प्रस्तुतसखीनो खेळात जीव रंगला’, सेलिब्रिटी रंजीता पाटील, क्रेजी फूडी रंजीता.
गुरुवार २३ नोव्हेंबर ५ ते ७ – ए .व्ही. ए. आगळावेगळा फॅशन शो, डॉ. रोहित शिंदे, बिग बॉस फेम, रात्री ७ ते १० – चेंदवणकर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ, देवेंद्र नाईक
शुक्रवार २४ नोव्हेंबर ५ ते ७ – कोकण उत्सव काव्योत्सव, विनोद पितळे. रात्री ७ ते १० – कलेश्वर पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ कुडाळ, लोकराजा सुधीर कलिंगण
शनिवार २५ नोव्हेंबर ५ ते ७ – नृत्य स्पर्धा, डान्स कॉम्पिटिशन सोलो, श्री आशिमिक महाराष्ट्राचा लावणी सम्राट, रात्री ७ ते १० – नृत्य स्पर्धा, ग्रुप डान्स कॉम्पिटिशन, विजया शिंदे, डान्स को-ऑर्गनायझर
रविवार २५ नोव्हेंबर ५ ते ७ – कोकण रत्न पुरस्कार, विद्यार्थी गुणगौरव सोहळा, किल्ले पुरस्कार, रात्री ७ ते १० – अमृतनाथ दशावतार नाट्यमंडळ म्हापण, वेंगुर्ला, अनंत गोसावी.
तरी सर्वांनी या कोंकण महोत्सवास अवश्य भेट द्यावी असे आवाहन दिलीप बारटक्के यांनी केले आहे.

 62,007 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.