फलंदाजीत अर्धशतकी खेळी करणाऱ्या यजमान स्पोर्टिंग क्लब कमिटीच्या यूग पाटीलनेi गोलंदाजीतही छाप पाडली.
ठाणे : फलंदाजीत अर्धशतकी खेळी करणाऱ्या यजमान स्पोर्टिंग क्लब कमिटीच्या यूग पाटीलनेi गोलंदाजीतही छाप पाडली. यूग आणि देवांश शिंदेच्या भेदक माऱ्यामुळे २५९ धावांचा पाठलाग करणाऱ्या स्पोर्ट्समन क्रिकेट क्लबला पहिल्या डावात १०८ धावांवर गुंडाळत यजमान संघाने १४ वर्षगटाच्या स्पोर्टिंग सीसी शताब्दी चषक क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावातील २५१ धावांच्या आघाडीच्या जोरावर स्पर्धेच्या पुढील फेरीतले आपले स्थान निश्चित केले. यूगने ३३ धावांत ५ आणि देवांशने ३२ धावांच्या मोबदल्यात चार बळी मिळवले.
दोन दिवसीय सामन्यातील पहिल्या डावात स्पोर्टिंग क्लब कमिटीने पार्थ राणे आणि यूग पाटीलच्या शतकी भागीदारीमुळे २५८धावापर्यंत मजल मारली. त्यानंतर यूग आणि देवांशच्या भेदक माऱ्यासमोर स्पोर्ट्समन क्रिकेट क्लबच्या एकाही फलंदाजाला तग धरता आला नाही. स्पोर्ट्समन संघाच्या अथर्व शिंदे (१५), आयुष वैती (१४) आणि अरहम शेखचा (१२)अपवाद वगळता त्यांच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावा करता आल्या नाहीत. यूग पाटीलने १२ षटकात दोन निर्धाव षटकांसह ३३ धावांत ५ फलंदाज बाद केले. देवांशने चार बळी मिळवताना १२.१ षटकात दोन निर्धाव षटके टाकली.
4,982 total views, 2 views today