एनएमएसए मेट्रो ग्रुप बॅडमिंटन सुपर लीग स्पर्धा
ठाणे : नेट निंजास संघाने साखळी लढतीतील आपली विजयी घौडदौड कायम राखत नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनच्या मेट्रो ग्रुप बॅडमिंटन सुपर लीग स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले.
स्पर्धेतील शेवटच्या साखळी लढतीत नेट निंजास संघाने मराठा वॉरियर्स संघाचा ३-१ असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. पहिल्या लढतीत निहार केळकर आणि प्रशांत बहातरेने गोकुळ वेंकटरमन-सौरभ दळवी या जोडीचा २१-१२ असा पराभव करत मराठा वॉरियर्सला चांगली सुरुवात करुन दिली. पण त्यानंतर नेट निंजास संघाने ओळीने पुढचे तिन सामने जिंकून निर्णायक फेरीत स्थान मिळवले. दुसऱ्या लढतीत आदित्य आर्डे आणि शैलेश सिंग जोडीने आदित्य वैशंपायन-प्रशांत बहातरे या जोडीवर २१-१६ असा विजय मिळवत नेट निंजास संघाला सामन्यात बरोबरी साधून दिली. अक्षय कदम आणि शिवानी हेर्लेकर या जोडीने आदित्य कांबळे- प्राची वालेपुरे या जोडीला २१-१२ असे चकवत नेट निंजास संघाला आघाडीवर नेले. त्यानंतरच्या लढतीत अक्षय कदम आणि शैलेश सिंग या जोडीने निहार केळकर-निनाद कामत यांचा प्रतिकार २१-१९ असा मोडून काढत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
10,859 total views, 1 views today