मराठा वॉरियर्स, फेदर कॅपची विजयी सलामी

एनएमएसए मेट्रो ग्रुप बॅडमिंटन सुपर लीग स्पर्धा लीग स्पर्धा

ठाणे : मराठा वॉरियर्स आणि फेदर कॅप संघांनी तुल्यबळ लढतीत विजय मिळवत नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनच्या मेट्रो ग्रुप बॅडमिंटन सुपर लीग स्पर्धेत विजयी सलामी दिली.
उदघाटनाच्या लढतीत मराठा वॉरियर्स संघाने द रॉकेटीयर्स संघाचा १०-८ असा पराभव करत विजयाचे खाते खोलले. निनाद कामत-प्रशांत बहातरे, निहार केळकर-प्रचिती वालेपुरे, आदित्य वैशंपायन आदी जोडयांनी आपापले सामने जिंकत संघाला चांगली सुरुवात करुन दिली होती. पण सिद्धार्थ पाटील- तुषार मुने,अभिज्ञ सावंत-जिनांश जैन, अचीत्य अगरवाल-विनीत दाबक यांनी सरशी मिळवत द रॉकेटीयर्स संघाला सामन्यात उभारी मिळवून दिली. या बरोबरीनंतर परतीच्या लढतीत निहार केळकर-प्रचिती वालेपुरे आणि आदित्य वैशंपायन-प्रशांत बहातरे यांनी सामने जिंकून संघाच्या पहिल्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
अन्य लढतीत फेदर कॅप संघाने स्मॅश इनाटर्स संघाचा १०-८, स्केचप्ले स्मॅशर्स संघाने एसएसआर मास्टर्स संघावर १२-६ असा विजय नोंदवले. वाशी येथील एनएमएसए क्रीडा संकुलात एनएमएसएचे अध्यक्ष आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ झाला.
राज्यस्तरीय बॅडमिंटन सुपर लीग स्पर्धेमध्ये राज्यातील दहा संघ सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा
नवी मुंबईमध्ये प्रथमच होत असून लिलाव पद्धतीने २५० खेळाडूंपैकी ८० खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
आमदार गणेश नाईक यांनी खेळाडूंना आपला खेळ उंचावत नेऊन यश प्राप्त करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. एनएमएसए दर्जेदार क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात नेहमीच अग्रस्थानी राहिल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी स्पर्धा आयोजन समितीचे श्रीशैल मिटकरी , प्रकाश श्रीनिवासन, प्रकाश कृष्णन, समीर नायर, प्रकाश शेट्टी, एनएमएसएचे विजय पाटील, प्रकाश श्रीनिवासन, कविता गांगुली, मेट्रो ग्रुपचे विजय जैन आणि हितेश जैन आदी मान्यवर उपस्थित होते.

 6,114 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.