दिपीत, श्रुतीला अग्रमानांकन

सीकेपी सोशल क्लबच्या सभागृहात सुरू झालेल्या स्पर्धेत १९, १७, १५, १३,११ वर्ष वयोगटाच्या मुलं मुलींच्या लढती खेळवण्यात येतील. १४ ऑक्टोबरपर्यंत रंगणाऱ्या या स्पर्धेत राज्यातील सुमारे ७५० टेबलटेनिसपटू सहभागी झाले आहेत

ठाणे : रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ, सीकेपी सोशल क्लब आणि सीकेपी ज्ञाती गृह ट्रस्ट आयोजित चौथ्या महाराष्ट्र राज्य गुणांकन टेबल टेनिस स्पर्धेत पुरुषांच्या एकेरी लढतीत ठाण्याच्या दिपीत पाटीलला तर महिला गटात ठाण्याच्या श्रुती अमृतेला अग्रमानांकन देण्यात आले आहे. आजपासून सीकेपी सोशल क्लबच्या सभागृहात सुरू झालेल्या स्पर्धेत १९, १७, १५, १३,११ वर्ष वयोगटाच्या मुलं मुलींच्या लढती खेळवण्यात येतील. १४ ऑक्टोबरपर्यंत रंगणाऱ्या या स्पर्धेत राज्यातील सुमारे ७५० टेबलटेनिसपटू सहभागी झाले आहेत. त्यात पुरुष गटात ८७ आणि महिलांमध्ये २५ खेळाडूंचा समावेश आहे.विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेतील मानांकित खेळाडू :
पुरुष – दिपीत पाटील, सिद्धेश पांडे, जश मोदी, चिन्मय सोमय्या, मंदार हर्डीकर, सिद्धेश सावंत, सिध्दांत देशपांडे, पार्थव केळकर.
महिला- श्रुती अमृते, श्रेया देशपांडे, सेन्होरा डिसुझा, संपदा भिवंडकर, अनन्या चांदे, अनन्या बसाक, आर्या सोनगडकर, समृद्धी कुलकर्णी.
मुले ११ वर्षाखालील – आयन अथर, मल्हार तळवळकर, आकर्षण ठाकूर, ऋषी भंगाडीया.
मुली – आद्या बाहेती, अद्विका प्रभुणे, वेदिका जयस्वाल, पलक झंवर.
मुले १३ वर्षाखालील – परम भिवंडकर, निलय पट्टेकर, प्रतीक तुलसानी, झैन शेख.
मुली – नैशा रेवसकर, सानवि पुराणिक, मायरा सांगलीकर, आद्या बाहेती.
मुले १५ वर्षाखालील – कौस्तुभ गिरगावकर, शौरेन सोमण, प्रतियुष बाऊवा, यश्विन गाडे.
मुली – दिव्यांशी भौमिक, काव्या भट, इशिका उमाटे, ह्रितीका मधुर.
मुले १७ वर्षाखालील – निल मुळ्ये, शार्वेय सामंत, विनीत दिपक, कुशल चोपडा.
मुली – दिव्यांशी भौमिक, अन्वी गुप्ते, काव्या भट, रियाना भूटा
मुले १९ वर्षाखालील -सागर कस्तुरे, जश मोदी, सिध्दांत देशपांडे, आदित्य जोरी.
मुली – संपदा भिवंडकर, दिव्यांशी भौमिक, धनश्री पवार, आर्या सोनगडकर.

 4,455 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.