ठाण्यात राज्य गुणांकन टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन

  रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ, सीकेपी सोशल क्लब आणि सीकेपी ज्ञाती गृहट्रस्टच्या विद्यमाने खेळवण्यात येणार स्पर्धा   


ठाणे : रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ, सीकेपी सोशल क्लब आणि सीकेपी ज्ञाती गृह ट्रस्टच्या चौथ्या महाराष्ट्र राज्य गुणांकन टेबल टेनिस टुर्नामेंटचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटना आणि ठाणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने १० ते १४ ऑक्टोबर दरम्यान खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत राज्यातील ८०० खेळाडूंनी या सहभाग नोंदवला आहे. त्यात ११ तारखेला पुरुष व महिला गट ,१२ तारखेला १९ वर्षाखालील मुलामुलीं, तर ११,१३,१५ व १७ वर्षाखालील मुलामुलींच्या १४ तारखेला स्पर्धा खेळवण्यात येतील. या कार्यक्रमाचे उदघाटन  १० ऑक्टोबर रोजी रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४२ चे प्रांतपाल मिलिंद कुलकर्णी, सी.के.पी.सोशल क्लबचे अध्यक्ष अतुल फणसे व सी.के.पी.ज्ञाती गृह ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त वीरेंद्र टिपणीस यांच्या हस्ते होणार असून यावेळी महाराष्ट्र राज्य, ठाणे जिल्हा टेबल टेनिस संघटना व रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

 10,406 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.