प्रतीक कोळीला दुहेरी यश

राज्य ज्युनियर अॅथलेटिक्स स्पर्धेत ठाणे जिल्ह्याला प्रथमच सांघिक विजेतेपद

ठाणे : चिपळूण येथील डेरवणमध्ये येथे पार पडलेल्या ३७ व्या महाराष्ट्र राज्य ज्युनियर अॅथलेटिक्स स्पर्धेत १४ वर्षीय मुलांच्या गटात छाप पाडताना ठाण्याच्या प्रतीक कोळीने ट्रायथलॉन आणि लांब उडी स्पर्धेत अव्वल स्थान पटकावत राष्टीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले. यस्पर्धेत ठाणे जिल्ह्याने चमकदार कामगिरी साधताना १४ वर्षाखालील मुलांच्या आणि १६ वर्षे वयोगटाच्या मुलींचे सांघिक विजेतेपद संपादन केले.
एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलात रंगलेल्या या स्पर्धेत प्रतिकने ट्रायथलॉनमध्ये एकूण १२७२ गुणांची कमाई करत आपले वर्चस्व राखले. याच स्पर्धेत ठाण्याच्या आयुष राठोडने १०४७ गुण नोंदवत कांस्यपदक जिंकले. लांब उडी स्पर्धेत प्रतिकने ५.६१ मीटर अशी कामगिरी साधत स्पर्धेतील दुसरे सुवर्णपदक पक्के केले. या गटातील ६० मीटर धावण्याच्या स्पर्धेत धैर्य सूर्यरावने आपला संघ सहकारी आयुष पाटीलला अवघ्या १० मिली सेकंदाच्या फरकाने मागे टाकत सुवर्णपदक जिंकले. धैर्यने ही शर्यत ७.५० सेकंद अशा वेळेत पूर्ण केली. तर आयुषने ७.६० अशी वेळ नोंदवली. मुलींच्या १६ वर्षगटात आंचल पाटीलने उंच उडीत १.६० अशी झेप घेत पहिले स्थान पटकावले. तर हॅक्सथलॉन स्पर्धेत २८१८ गुणांसह आंचलला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. ही स्पर्धा ठाण्याच्या वैष्णवी गोपनरने २९५९ गुणांसह जिंकली.या गटातील १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत १२.४० सेकंद अशी कामगिरी साधत मिहिका सुर्वेने सुवर्णपदक जिंकले. श्रेष्ठा शेट्टीने ५.१८ अशी उडी मारत ठाण्याला सुवर्णपदक जिंकून दिले. ठाणे जिल्ह्याने स्पर्धेत ८ सुवर्ण, ८रौप्य आणि ५ कांस्यपदके जिंकली. सर्वश्री अजित कुलकर्णी यांनी ठाणे जिल्ह्याच्या प्रशिक्षक पदाची जबाबदारी सांभाळली तर श्रध्दा मान्द्रेकर संघाच्या व्यवस्थापिका होत्या.
स्पर्धेतील इतर पदक विजेते
१४ वर्ष गट मुले : ६०० मीटर धावणे – १:२९:४० सेकंद , रौप्यपदक. ट्रायथलॉन : १०४७ गुण, कांस्यपदक. भाला फेक : शौर्य सिंग – २७.८८ मीटर, कांस्यपदक.
मुली : उंच उडी : श्रावणी घुडे – १.३६मीटर – रौप्यपदक, लांब उडी : ४.५० मीटर – कांस्यपदक. भालाफेक : त्रिष्मी पगारे – २१. ०३ मीटर: कांस्यपदक.
१६ वर्षाखालील मुले : अभिज्ञान निकम – लांब उडी – ६.१० मीटर – कांस्यपदक. १००० मीटर रिले : टिम ठाणे ( ट्रीस्टन डिसुझा, गिरीक बंगेरा, अथर्व भोईर, अभिज्ञान निकम )२:०५:२० सेकंद – रौप्यपदक.
मुली : भाला फेक : अनन्या पुजारी -३०.४५ मिटर – कांस्यपदक. १०० मीटर धावणे : शौर्या अंबुरे : १२.७० सेकंद : कांस्यपदक. १००० मीटर मिडले रिले : टिम ठाणे ( मिहिका सुर्वे, प्रेक्षा कोलते, शौर्या अंबुरे, श्रेष्ठा शेट्टी) २:२८:२० सेकंद.

 11,019 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.