मुंबईकर कराटेपटूंना मिळाले जपानी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन

मुंबईसह देशातील आसाम, दिल्ली हैद्राबादसह नेपाळमधील सुमारे दोनशेहून अधिक  कराटेपटू सहभागी झाले

मुंबई : जपान देशाला कराटे खेळाची पंढरी समजली जाते. त्यामुळे स्वसंरक्षणासाठी योग्य खेळ समजल्या जाणाऱ्या कराटे खेळाचे प्रगत प्रशिक्षण घेण्यासाठी जपानला जाण्याची बहुतेक कराटेपटूची इच्छा असते. पण पैशाअभावी सगळ्यांनाच ते शक्य होत नाही. त्यामुळे भारतातील होतकरू आणि उदोयन्मुख कराटेपटूना मायदेशातच मार्गदर्शन कसे मिळेल याचा ध्यास ट्रेडिशनल शोतोकान शिनकाई कराटे असोसिएशन ऑफ इंडियाचे महासचिव विशाल जाधव यांना लागला होता. त्यासाठी त्यांनी मागील काही वर्षांपासून  जपानमधील आपल्या मातुल संघटनेशी पत्रव्यवहारहि केला होता. अखेर यंदा त्याच्या या प्रयत्नांना यश आले अन इंटरनॅशनल शोतोकान शोबुकान कराटे संघटनेचे वर्ल्ड ग्रँडमास्टर कांचो मसाया कोहोमा कराटेपटूंना विशेष मार्गदर्शन करण्यासाठी मुंबईत आले होते. भांडुप येथील हार्मोनी सभागृहात कोहोमा यांनी काता आणि कुमीते प्रकारातील नव्या तंत्राबाबत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी प्रात्यक्षिकासह उपस्थित कराटेपटूकडून सरावहि करून घेतला. यावेळी बोलताना कोहोमा म्हणाले, मार्शल आर्ट्स किंवा संसरक्षण क्रीडा प्रकारच्या विकासात भारताचेही मोलाचे योगदान आहे. भारतीय खेळाडूंनी या खेळाचे तंत्र घोटवल्यास  ते जागतिक पातळीवर आपला ठसा उमटवू शकतील. विशाल जाधव आणि राजकपूर बागडी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या दोन दिवसीय सराव शिबिरात कोहोमा यांच्याकडून तंत्र शिकून घेण्यासाठी मुंबईसह देशातील आसाम, दिल्ली हैद्राबादसह नेपाळमधील सुमारे दोनशेहून अधिक  कराटेपटू सहभागी झाले होते. 

 482 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.