एस आर ग्रुप, अंबरनाथ रायझिंग उपांत्य फेरीत

रंगतदार लढतीत एस आर ग्रुपने बॉईज क्रिकेट क्लबचा आणि अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लबचा केला पराभव.

ठाणे : रंगतदार लढतीत एस आर ग्रुपने बॉईज क्रिकेट क्लबचा आणि अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लबचा पराभव करत महाराष्ट्र माझा सेवा संस्था आयोजित टिपीएल मुख्यमंत्री चषक टी -२०लीग क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले.
उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत एस आर ग्रुपने बॉईज क्रिकेट क्लबचा सात धावांनी पराभव केला. बॉईज ग्रुपने २० षटकात ५ बाद १५२ धावांचे दिलेले आव्हान एस आर ग्रुपने १६.१ षटकात दोन फलंदाजांच्या मोबदल्यात १५७ धावा करत पार केले. सागर मिश्राने संघाच्या विजयात मोलाचे योगदान देताना नाबाद ५२ धावांची अर्धशतकी खेळी केली. शशांक अत्तरडेने ४३ तर आनंद बैसने नाबाद ३८ धावा केल्या. त्याआधी योगेश डोंगरेने नाबाद ४८ आणि आदित्य रावच्या ४८ धावांमुळे बॉईज क्रिकेट क्लबने दीड शतकी धावसंख्या उभारली.
अन्य लढतीत अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लबने शिवांश क्रिकेट क्लबचा ९ धावांनी पराभव करत स्पर्धेतील आगेकूच कायम राखली. शुभम पुण्यार्थी (६२) आणि प्रसाद पवारच्या (६७) अर्धशतकांच्या जोरावर अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लबने २० षटकात ९ बाद १७४ धावा केल्या. त्यानंतर पराग पाटीलने भेदक गोलंदाजी करत शिवांश क्रिकेट क्लबला २० षटकात १६५ धावांवर रोखले. परागने ३.५ षटकात २५ धावा देत पाच विकेट्स मिळवल्या. पराभुत संघाकडून निखिल पाटीलने ६८ धावांची खेळी केली.
संक्षिप्त धावफलक : बॉईज क्रिकेट क्लब : २० षटकात ५ बाद १५२ ( योगेश डोंगरे नाबाद ४८, आदित्य रावत ४८, वैभव माळी ४-१३-२, शशांक अत्तरडे ३-२२-१) पराभूत विरुद्ध एस आर ग्रुप : १६.१ षटकात २ बाद १५७ (सागर मिश्रा नाबाद ५२, शशांक अत्तरडे ४३, आनंद बैस नाबाद ३८, साहिल फेगडे २-१२-१, यश सिंग ४-३१-१).

अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लब : २० षटकात ९ बाद १७४ ( प्रसाद पवार ६७, शुभम पुण्यार्थी ६२, भावेश पटेल २५, योगेश पाटील ४-३२-२, कर्ष कोठारी ४-१-२०-२) विजयी विरुद्ध शिवांश क्रिकेट क्लब : १९.५ षटकात सर्वबाद १६५ ( निखिल पाटील ६८, सृजन आठवले २९, पराग पाटील ३.५-२५-५, प्रथमेश महाले ३-३०-२, भावेश पटेल ४-२६-२).

 48,329 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.