हर्षल जाधवचे दणकेबाज शतक

हर्षलने ५५ चेंडूत १३ चौकार आणि तीन षटकार ठोकत स्पर्धेतील पहीला शतकविर होण्याचा बहुमान मिळवला.

ठाणे : हर्षल जाधवच्या दणकेबाज शतकाच्या जोरावर बॉईज क्रिकेट क्लबने ठाणे ईगल्स स्ट्रायकर संघाचा ७९ धावांनी पराभव करत महाराष्ट्र माझा सेवा संस्था आयोजित टिपीएल मुख्यमंत्री चषक टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत आगेकूच कायम राखली. हर्षलने ५५ चेंडूत १३ चौकार आणि तीन षटकार ठोकत स्पर्धेतील पहीला शतकविर होण्याचा बहुमान मिळवला.
हर्षलच्या शतकी खेळीमुळे बॉईज क्रिकेट क्लबने २० षटकात ७ बाद १८९धावांचे आव्हान उभे केले. योगेश डोंगरेने २५ आणि विश्वजित जगदाळेने १९ धावा केल्या. ऋषिकेश जाधवने ३ तर विशाल गुप्ता, कल्पेश सावंत आणि अश्विन शेळकेने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.
विजयाच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या ठाणे ईगल्स स्ट्रायकरचा डाव १८.९ षटकात ११० धावांवर आटोपला. भुपेन लालवानी(३३) आणि नितेश रायचा (२८) अपवाद वगळता ठाणे ईगल्स स्ट्रायकर संघाचे इतर फलंदाज धावा बनवण्यात अपयशी ठरले. श्रेयस गुरव, यश सिंग, विश्वजित जगदाळे आणि योगेश पाटीलने प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या.
संक्षिप्त धावफलक : बॉईज क्रिकेट क्लब : २० षटकात ७ बाद १८९ ( हर्षल जाधव १०१, योगेश डोंगरे २५, विश्वजित जगदाळे १९, ऋषिकेश जाधव ४-४३-३, विशाल गुप्ता ४-३४-१, कल्पेश सावंत ४-२-१, अश्विन शेळके ३-२८-१) विजयी विरुद्ध ठाणे ईगल्स स्ट्रायकर : १८.४ षटकात सर्वबाद ११० (भुपेन लालवानी ३३, नितेश राय २८, श्रेयस गुरव ३-५-२, विश्वजित जगदाळे ४-२७-२, यश सिंग ४-३१-२, योगेश पाटील १.४-८-२).

 27,533 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.