तुषार क्रिकेट अ‍ॅकॅडमीच्या विजयात अथर्व सुर्वे चमकला

अथर्व सुर्वेचे निर्धाव षटकासह ४बळी
ठाणे : बदलापूर येथील जगन्नाथ क्रीडा संकुल येथे हिंदुहृदयसम्राट चषकाचे आयोजन करण्यात आले आहे. लिग समान्यात आज तुषार क्रिकेट अ‍ॅकॅडमी विरुध्द बदलापूर क्रिकेट अ‍ॅकॅडमी असा सामना खेळला गेला. या सामन्यात मध्यमगती तेज गोलंदाज अथर्व सुर्वे याच्या गोलंदाजीमुळे तुषार क्रिकेट अ‍ॅकॅडमीने एक हाती सामना जिंकला. अथर्वने ६ षटकांपैकी एक षटक निर्धाव टाकत २५ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले.
नाणेफेक जिंकून तुषार क्रिकेट अ‍ॅकॅडमीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अर्णव वानखेडे (३४ धावा), अर्णव निकाळजे (३१ धावा) आणि वेदांश (४१ धावा) या फलंदाजांच्या जोरावर तुषार क्रिकेट अ‍ॅकॅडमीने ३३ षटकांत सर्व गडी बाद २३४ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या बदलापूर क्रिकेट अ‍ॅकॅडमीच्या फलंदाजांना अथर्व सुर्वे याने एकापाठोपाठ बाद करत ४ बळी घेत घेतले. बदलापूर क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा संघ २४ षटकांत ९७ धावांवर गुंडाळला. १३७ धावांनी तुषार क्रिकेट अ‍ॅकॅडमीने हा सामना जिंकला. अथर्वला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

 28,476 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.