शिवांश क्रिकेट क्लब उपांत्यपूर्व फेरीत

सिद्धेश आणि राहुल फटकेबाजी करत असताना अंकित चव्हाणने ३१ धावांत ४ विकेट्स मिळवत संघाला विजयाचा मार्ग दाखवला.

ठाणे : शिवांश क्रिकेट क्लबने गोल्डन स्टार क्रिकेट क्लबचा २३ धावांनी पराभव करत महाराष्ट्र माझा सेवा संस्था आयोजित टिपीएल मुख्यमंत्री चषक टी-२० लीग क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. रोमहर्षक लढतीत २०० धावांचा पाठलाग करणाऱ्या गोल्डन स्टार क्रिकेट क्लबला १७७ धावांवर रोखत शिवांश क्रिकेट क्लबने विजय मिळवला.
प्रथम फलंदाजी करताना सृजन आठवलेने नाबाद ८५ धावांची खेळी करत संघाच्या द्विशतकी धावसंख्येत मोलाचे योगदान दिले. त्यापाठोपाठ संकेत व्यवहारेने ४२ आणि अंकित चव्हाणने २८ धावा करत शिवांश क्रिकेट क्लबच्या धावसंख्येला आकार दिला. गोल्डन स्टारच्या स्वप्नील दळवीने दोन विकेट्स मिळवल्या पण त्यासाठी त्याने ५० धावा मोजल्या. अमोल तनपुरे आणि ओमकार करंदीकरने प्रत्येकी एक विकेट मिळवली.
या मोठया आव्हानाचा पाठलाग करताना सुरुवातीला झटपट विकेट्स गमावल्यावर सिद्धेश गावंडे आणि राहुल कश्यपने आक्रमक खेळ गोल्डन स्टार संघाचे सामन्यातील आव्हान जिवंत ठेवले. प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर हल्लाबोल करत सिद्धेशने ७३ धावा केल्या तर राहुलने ५७ धावा केल्या. प्रणव यादवने २२ धावा केल्या. सिद्धेश आणि राहुल फटकेबाजी करत असताना अंकित चव्हाणने ३१ धावांत ४ विकेट्स मिळवत संघाला विजयाचा मार्ग दाखवला. योगेश पाटील आणि कर्ष कोठारीने प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या.
संक्षिप्त धावफलक : शिवांश क्रिकेट क्लब : २० षटकात ५ बाद २०० (सृजन आठवले नाबाद ८५, संवेद व्यवहारे ४२, अंकित चव्हाण २८, स्वप्निल दळवी ४-५०-२, अमोल तनपुरे ४-३८-१, ओमकार करंदीकर ४-२६-१) विजयी विरुद्ध गोल्डन स्टार क्रिकेट क्लब : २० षटकात ८ बाद १७७.(सिद्धेश गावंडे ७३, राहुल कश्यप ५७, प्रणव यादव २२, अंकित चव्हाण ४-३१-४, योगेश पाटील ४-२५-२, कर्ष कोठारी ४-३०-२).

 9,670 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.