ठाणे पालिकेची आगेकूच कायम

पीडब्ल्यूडी संघाच्या फलंदाजीला खिंडार पाडताना हर्षल सोनीने १२ धावांत ५ विकेट्स मिळवल्या.

ठाणे : ठाणे महापालिकेने पीडब्ल्यूडी संघाचा नऊ धावांनी दणदणीत पराभव करत ३७ व्या ठाणेवैभव आंतरकार्यालयीन क्रिकेट स्पर्धेत आगेकूच कायम राखली. पीडब्ल्यूडी संघाला ८३ धावांवर गुंडाळल्यावर ठाणे महापालिकेने ६.५ षटकात १ बाद ८६ धावा करत विजय निश्चित केला.
पीडब्ल्यूडी संघाच्या विश्वास पाटील आणि प्रविण शिरसाटचा अपवाद वगळता इतरांना धावा करण्यात अपयश आले. विश्वासने २७ आणि प्रविणने १९ धावा केल्या. पीडब्ल्यूडी संघाच्या फलंदाजीला खिंडार पाडताना हर्षल सोनीने १२ धावांत ५ विकेट्स मिळवल्या.शशिकांत कदमने २५ धावांत ३ विकेट मिळवल्या. ठाणे महापालिकेच्या सोप्या विजयावर शिक्कामोर्तब करताना विकी पाटीलने नाबाद २४, ओमकार रहाटेने नाबाद २० आणि जयदीप परदेशीने ३५ धावांचे योगदान दिले.
संक्षिप्त धावफलक : पीडब्ल्यूडी संघ : २२.२ षटकात सर्वबाद ८३( विश्वास पाटील २७, प्रविण शिरसाट १९, हर्षल सोनी ५.२-१-१२-५, शशिकांत कदम ७-२-२५-३, निखिल बागल ३-१२-१, अर्जुन शेट्टी २-६-१) पराभूत विरुद्ध ठाणे महापालिका : ६.५ षटकात १ बाद ८६ ( विकी पाटील नाबाद २४, ओमकार रहाटे नाबाद २०, जयदीप परदेशी ३५).

 17,514 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.