मोहम्मद करिमचे विकेट्सचे पंचक

संघाला गरज असताना मोहम्मद करिमने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत बेनेटॉन क्रिकेट क्लबला विजयापासून लांब ठेवले.

ठाणे : ऋषिकेश पवार आणि शाश्वत जगतापची झुंझार अर्धशतकी खेळी, मोहम्मद करिमच्या पाच विकेट्स हे यूनियन क्रिकेट क्लबने बेनेटॉन क्रिकेट क्लबवर ८ धावांनी मिळवलेल्या निसटत्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले. महाराष्ट्र माझा सेवा संस्था आयोजित टिपीएल मुख्यमंत्री चषक टी – २० लीग क्रिकेट स्पर्धेतील रंगतदार सामन्यात १८८ धावांचा पाठलाग करणाऱ्या बेनेटॉन क्रिकेट क्लबला १८० धावांवर रोखत यूनियन क्रिकेट क्लबने दुसऱ्या फेरीत स्थान मिळवले.
दादोजी कोंडदेव क्रीडाप्रेक्षागृहात झालेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय यूनियन क्रिकेट क्लबच्या फलंदाजांनी सार्थ ठरवला. ऋषिकेश पवारने धुवांधार फलंदाजी करताना सात चौकार आणि सहा षटकार ठोकत ८५ धावा केल्या. त्यापाठोपाठ शाश्वत जगतापने ५१ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. तुषार चाटेने २५ धावांचे योगदान दिले. बेनेटॉन संघाकडून इम्रोझ खान सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. इम्रोझने ३८ धावांत ४ विकेट्स मिळवल्या. राहुल सोलकर आणि योगेश पवारने प्रत्येकी एक विकेट मिळवली.
त्यानंतर योगेश पवारने ६२ धावांची आक्रमक खेळी करत संघाला विजयाची आस दाखवली. पण संघाला गरज असताना मोहम्मद करिमने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत बेनेटॉन क्रिकेट क्लबला विजयापासून लांब ठेवले. निखिल पाटीलने ३३ आणि आदित्य गंगारेने २६ धावा केल्या. गोलंदाजीतही छाप पाडताना शाश्वत जगतापने १९ धावांत दोन विकेट्स मिळवल्या.
संक्षिप्त धावफलक : यूनियन क्रिकेट क्लब : २० षटकात ६ बाद १८८ ( ऋषिकेश पवार ८५, शाश्वत जगताप ५१, तुषार चाटे २५, इम्रोझ खान ४-३८-४, राहुल सोलकर ३-२८-१, योगेश पवार ४-२०-१) विजयी विरुद्ध बेनेटॉन क्रिकेट क्लब : १९.५ षटकात सर्वबाद १८०( योगेश पवार ६२, निखिल पाटील ३३, आदित्य गंगारे २६, करिम मोहम्मद ४-२२-५, शाश्वत जगताप २-१९-२, शुभम वर्मा २.५ – २२-१, अंकित तिवारी २-१७-१, सुदिप पाठक २-३७-१).

 8,831 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.