`मन की बात’ व सरल अँप सह ३५ हजार रुग्णांची तपासणी

भाजपा वैद्यकीय आघाडीचा अनोखा उपक्रम

ठाणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात' कार्यक्रमाचा १०० वा भाग ऐकण्यासाठी आलेल्या हजारो नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्याचा अनोखा कार्यक्रम राज्यभरात राबविण्यात आला. वैद्यकीय आघाडीचे प्रदेश संयोजक डॉ. अजित गोपछडे व प्रदेश सहसंयोजक डॉ. बाळासाहेब हरपळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईसह शहरांबरोबरच ग्रामीण भागातही आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून ३५ हजार ७५० हून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली. ठाण्यात झालेल्या शिबिरात आवश्यक असलेल्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश वैद्यकीय आघाडीचे प्रमुख डॉ. अजित गोपछडे यांनी राज्यातील प्रत्येक जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणांसह दुर्गम भागात मन की बात कार्यक्रम आयोजित करण्याची सूचना दिली होती. वैद्यकीय आघाडीचे पदाधिकारी व सदस्यांनी क्लिनिक, हॉस्पिटलच्या ठिकाणीमन की बात’ कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाचे आयोजन केले होते. त्यावेळी या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांचे भविष्यात उत्तम आरोग्य राहावे, यासाठी मोफत वैद्यकीय शिबिरे घेतली गेली. त्यानुसार राज्यातील १४१ ठिकाणी झालेल्या वैद्यकीय शिबिरात मोफत कान नाक घसा तसेच विविध आरोग्य तपासणी करण्यात आली. काही ठिकाणी नेत्रशिबिरे व मधुमेह तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते.
वैद्यकीय आघाडीचे ठाणे-कोकण विभाग संयोजक डॉ. राहुल कुलकर्णी यांनी शिबिराबरोबरच गरजू नागरिकांसाठी मोफत शस्त्रक्रिया करण्याचेही शिबिराचे आयोजन केले होते. तर अकोला शहरात डॉ. किशोर मालोकार यांच्या वतीने शहरात मोफत होमिओपॅथी औषधांचे वाटप करण्यात आले.डॉक्टर सौरभ अग्रवाल व डॉ. प्रीती मानमोडे यांनी कामठी येथे आयोजित केलेल्या शिबिराला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. वैद्यकीय आघाडीच्या डेंटल, आयुर्वेद, पॅरामेडिकल, होमिओपॅथी, महिला आघाडी, विद्यार्थी आघाडी आदींनी सक्रिय सहभाग घेतला.

 125 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.