केनिया संघाला दुहेरी मुकुट

सहावी विश्वकरंडक रोलबॉल स्पर्धा : भारत उपविजेता

पुणे : केनिया संघाने भारताला अंतिम लढतीत पराभूत करताना सहाव्या विश्वकरडंक रोलबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. मागील विश्वकरंडक स्पर्धेत भारताने अंतिम लढतीत केनियाला पराभूत करताना विजेतेपद पटकावले होते. यास्पर्धेत मात्र केनियाने भारतावर विजय मिळविताना पराभवाची परतफेड केली.
म्हाळुंगे – बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती स्टेडियम येथील मैदानावर सुरु असलेल्या स्पर्धेच्या अंतिम लढतीत केनिया संघाने भारताला ७-४ असे पराभूत केले. मध्यंतराला केनिया संघ ४-२ अशी २ गोलची आघाडी घेतली होती. केनिया संघाकडून ग्रीफिंसने ३  (१.२५, २३.२५ व २४.००), बोनफेसने २ (२१.०० व २२.००) तर मोझेसने (१०.३६) व ब्रीयान (१२.२८) यांनी प्रत्येकी एक गोल करताना संघाला विजय मिळवून दिला. भारताकडून सचिन सैनीने २ (२२.४० व ३८.२०), आदित्य सुतार (५.०८) व आकाश गणेशवाडे (११.२०) यांनी प्रत्येकी १ गोल केला.  
महिला गटाचे विजेत्यांचे पुरस्कार वितरण उच्च व तंत्रशिक्षण तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, राज्य भाजपाचे सरचिटणीस धीरज घाटे, भारतीय रोलबॉल संघटनेचे चेयरमन सुर्यकांत काकडे, आशियाई रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष एस. एस. रॉय, भारतीय रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष मनोहर कांत, उपाध्यक्ष मनोज यादव, सचिव चेतन भांडवलकर, महाराष्ट्र रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, रोलबॉलचे जनक राजू दाभाडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.  
तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतीत सेनेगल संघाने लॅटव्हिया संघाला ८-५ असे पराभूत केले. मध्यंतराला सेनेगल संघाने ५-० अशी आघाडी घेतली होती. सेनेगल संघाकडून क्रिस्ट रोबर्टने ६ (१.२८, २.००, ५.३५, ६.००, २६.१०, २७.००) तर मौहामेट व खादीम यांनी प्रत्येकी एक गोल केला.  लॅटव्हिया संघाकडून इगोरस सोकोव्ह्जने ४ (१६.०२,१६.१२, २०.००, २०.४८ ) तर व्हिस्टरुउस सिमेरमणीसने एक गोल केला. 
तत्पूर्वी पुरुष गटाच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या लढतीत भारताने सेनेगलला १०-७ असे पराभूत करताना स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला भारताने ५-३ अशी दोन गोलची आघाडी घेतली होती. भारताकडून आकाश गणेशवाडेने ३ (९.३२, ३१.४७, ४०.००), मिहीर साने  (९.३२ व  ३१.१०) व सचिन सैनी (१४.४०, ३६.३८) यांनी प्रत्येकी २ तर श्रीकांत साहू (४२.११) आदित्य सुतार (७.१४) व  हर्षल घुगे (२४.०२) यांनी प्रत्येकी एक गोल केला. सेनेगल संघाकडून मौहामेटने तब्बल सहा (१३.५२, १९.०२, १९.४५, २७.४८, ३४.३० व ४८.४३) गोल मारले. मामाडौऊ अलिओने (४३.५९) एक गोल केला.
पुरुष गटाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत केनिया संघाने लॅटव्हिया संघाला १४-१ असे पराभूत केले. मध्यंतराला केनियाने ९-१ अशी विजयी आघाडी घेतली होती. केनिया संघाकडून ग्रीफिंसने ६ (२१.३४, २३.४२, २४.१९, २५.३४, २७.२०, ३१.३३),  जोशुआ ओयांगोने ३ (८.४६, १५.१३, १९.४२), जोशुआ चोटीने २ (१३.५४, २२.५४), तर मोजेस (२८.४३), जेम्स म्वंगी (३०.१२) व बोनफेस (०.५९) यांनी प्रत्येकी एक गोल केला. लॅटव्हियाकडून व्हिस्टरुउस सिमेरमणीसने (१९.१७) एक गोल केला.        

 129 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.