गरजू रुग्णांसाठी विठ्ठल सायन्ना रुग्णालयाचा शल्यचिकित्सा विभाग ठरतोय देवदूत

रुग्णालया शिफ्टींगचे काम सुरू असताना डॉ. निशिकांत रोकडे आणि डॉ प्रतीक बिस्वास यांनी असाध्य रोगांवर लेझर आणि दुर्बीणद्वारे ५० हून अधिक केल्या शस्त्रक्रिया. पोटातील कर्करोग गाठ, व्हेरिकोज व्हेन्स,
पित्ताशय, हर्निया आदी रोगांच्या झाल्या शस्त्रक्रिया

ठाणे : विठ्ठल सायन्ना ठाणे जिल्हा शासकिय रुग्णालयाचे रूपांतर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये होण्यासाठी दिड वर्षांची वाट बघावी लागणार असली तरी, या धावपळीत रुग्णांची गैरसोय होणार नाही याची दक्षता रुग्णालयाने घेतली आहे. रुग्णालय शिफ्टींगच्या काळात देखील गरीब रुग्णांच्या कठीण शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉ. निशिकांत रोकडे व डॉ प्रतीक बिस्वास देवदूत ठरत आहेत. गेल्या तीन महिन्यात खाजगी रुग्णालयात होणाऱ्या दुर्बीण आणि लेझर मशिंच्याच्या साहाय्याने होणाऱ्या हर्निय, पित्ताशय, पोटातील कर्करोगाची गाठ, व्हेरिकोज व्हेन्स, आदी स्वरूपाच्या सुमारे ५० हून अधिक महागड्या शस्त्रिकिया केल्याने रुग्णांसाठी खऱ्या अर्थाने शल्यचिकित्सा विभाग वरदान ठरतो आहे.
सरकारी रुग्णालयात कोणतीही शस्त्रक्रिया करताना पोटात गोळा येतो. शस्त्रक्रिया कशी होईल व्यवस्थित होईल का ? अशा नाना शंका मनात येतात. अशातच सिव्हील रुग्णालय पाडून या जागेत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभे राहणार आहे. सहा महिन्यांपूर्वी संबंधित रुग्णालयाच्या कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे रुग्णालयातील विभाग दुसऱ्या जागेत स्थलांतरित करण्याचे काम सुरू आहे. मात्र यामध्ये रुग्णांना त्रास होणार नाही याची काळजी आरोग्य विभागाने घेतली आहे. रुग्णांवर चागले उपचार आणि शस्त्रक्रिया करताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्बीण आणि लेझर मशिनद्वारे ५०हून अधिक शस्त्रक्रिया रुग्णालयाचे सर्जन डॉ. निशिकांत रोकडे आणी डॉ. प्रतीक बिस्वास यांनी यशस्वी पार पडल्या आहेत.
पित्ताशय, पोटातील कर्करोगाची गाठ, हर्निया, व्हेरिकोज व्हेन्स, मूळव्याध आदी रोगांच्या दुर्बिणद्वारे होणाऱ्या शस्त्रक्रिया अथवा लेझर मशीनद्वारे केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया खाजगी रुग्णालयात करणे खूपच खर्चिक आहे. सर्वसामान्य रुग्णांना हा खर्च परवडणारा नसतो. परंतु शासकीय रुग्णालयात लेझर आणि दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया केल्या जातं आहेत. रुग्णालय स्थलांतर होण्याच्या धावपळीत रुग्णांवर अशा शस्त्रक्रिया होत असल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.दुर्बीण आणि लेझर शस्त्रक्रियेत रुग्णांना त्रास कमी होतो. रुग्णांचा रक्तस्त्राव आणि वेदना कमी होतात. शस्त्रक्रिया कमी कालावधीत होते.या शस्त्रक्रिया करताना एनेस्थीसिया विभागा च्या डॉ रूपाली यादव व डॉ प्रियांका महांगड़े इतर वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान मिळत आहे. – डॉ. निशिकांत रोकडे (शल्य चिकित्सक, विठ्ठल सायन्ना रुग्णालय ठाणे)
नवीन रुग्णालयाचे भूमिपूजन झाले असले तरी रुग्णांची कोणतीच गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली आहे. रुग्णालय शिफ्टींगच्या दिवसात डॉ. निशिकांत रोकडे आणी डॉ प्रतीक बिस्वास यांच्या टीमने दुर्बीण आणि लेझर मशीनवर शस्त्रक्रिया मोठ्या कुशलतेने हाताळल्या आहेत. येत्या काही दिवसात वागळे इस्टेट येथील आरोग्य विभागाच्या जागेत अद्यावत शल्य चिकित्सा विभाग तयार केला आहे. त्यामुळे रुग्णांना या शस्त्रक्रिया करणे अधिक सोयीचं होणार आहे – डॉ. कैलास पवार, (जिल्हा शल्य चिकित्सक, ठाणे.)

 117,179 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.