यंदाही ठाण्यात आंबा महोत्सवाची धूम

संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित २ ते १४ मे या कालावधीत आंबा महोत्सव

ठाणे : असह्य उकाड्यातही ठाणेकरांना यंदा आंबा महोत्सवाची धूम अनुभवता येणार आहे. महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत तसेच,संस्कार प्रतिष्ठान व कोकण विकास प्रतिष्ठानच्यावतीने २ मे ते १४ मे या कालावधीत सकाळी १० ते रात्री पर्यंत १० पर्यंत, ठाण्यातील गावदेवी मैदान येथे भव्य आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. आंबा महोत्सवाचे हे यंदाचे १६ वे वर्ष आहे. यावेळी मुख्य आयोजक आ. संजय केळकर यांच्यासमवेत कोकण विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र तावडे, माजी उपमहापौर सुभाष काळे, अशोक भोईर,ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, ठामपा परिवहन सदस्य विकास पाटील, पु.ल.देशपांडे कला अकादमीचे सदस्य मकरंद मुळे,संतोष साळुंखे आदी उपस्थित होते.
ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि पणन मंडळ पुरस्कृत संस्कार प्रतिष्ठान व कोकण विकास प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदा हा आंबा महोत्सव ठाणे पश्चिमेकडील गावदेवी मैदानात होत आहे. या आंबा महोत्सवाच्या माध्यमातुन कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी आणि ग्राहकांची थेट भेट होऊन लाखोंची उलाढाल होत असते. यात शेतक-यांना फायदा होतोच शिवाय, ग्राहकांनाही कोकणातील अस्सल हापूस आंबा योग्य दरात मिळतो.
यावेळी बोलताना आमदार संजय केळकर यांनी,कोकणात १ लाख ८० हजार हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकतो.यंदा अवकाळी पाऊस,ढगाळ हवामान तसेच अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे आंब्याचे उत्पादन घटले आहे.२०२० ला ३ लाख २१ हजार मेट्रिक टन, २०२१ ला २ लाख ५६ हजार मेट्रीक टन , २०२२ ला १ लाख २८ हजार मेट्रीक टन आंबा उत्पादन झाले आहे.यंदादेखील अवघे २० टक्के आंबा पीक आले आहे. तेव्हा शेतकऱ्याला पाठबळ देण्यासाठी अशाप्रकारचे आंबा महोत्सव आयोजीत केला असुन महोत्सवात एकुण ४० स्टॉल्स असणार आहेत,पैकीपाच स्टॉल महिला बचत गटाकरीता असतील. असे आमदार केळकर यांनी सांगितले.
 आंब्यांची ऑनलाईन विक्री
गावदेवी मैदानात आंबा महोत्सवात प्रत्यक्ष विक्री सोबतच ऑनलाईन विक्रीची सुविधाही उपलब्ध ठेवल्याचे आमदार संजय केळकर यानी सांगितले.यासाठी खवय्यांनी राजेंद्र तावडे ९८६९०१६०९२ आणि दिनेश मांजरेकर यांच्याशी ९८१९०९७६५० या क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन आमदार केळकर यांनी केले आहे.

 55,021 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.