नवी मुंबई येथे लघुउद्योजकांचे “महाइंडेक्स २०२३” औद्योगिक प्रदर्शन

महा इंडेक्स २०२३ ह्या औद्योगिक प्रदर्शनाला  माननीय मुख्यमंत्री  व उपमुख्यमंत्र्यांसह महाराष्ट्र शासनाचा संपूर्ण पाठींबा 

ठाणे :  महाइंडेक्स २०२३ हे औद्योगिक प्रदर्शन   सिडको एक्झिबिशन सेंटर वाशी, नवी मुंबई येथे १ ते ३ जून  दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोसिएशन्सचे अध्यक्ष संदीप पारीख, राष्ट्रीय कोसिआचे मानद महासचिव निनाद जयवंत, टिसाच्या अध्यक्ष  सुजाता सोपारक ,टिसाचे उपाध्यक्ष भावेश मारू, यांनी दिली
चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोसिएशन्स (COSIA)  व  महाराष्ट्रातील सुमारे ३५ औद्योगिक संघटना प्रथमच एका छताखाली नेटवर्कसाठी एकत्र येणार असल्याने हे महाराष्ट्रातील पहिले मेगा इंडस्ट्रियल एक्स्पो (MahaindX) आहे.
MahaindX मध्ये लघुउद्योगांना त्यांची उत्पादने प्रदर्शित  करता येतील .तसेच त्यांची  काम करण्याची क्षमता प्रदर्शित करता येईल.  संभाव्य ग्राहकांशी नेटवर्क करण्यास आणि नवीन व्यवसाय संधी शोधण्यासाठी एक वेगळे महत्त्वाचे व्यासपीठ कोसिआ मार्फत उपलब्ध होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होण्याच्या दृष्टीने केंद्राच्या इंडस्ट्री 4.0 ह्या थीमसह,   MahaindX  मध्ये इंटरनेट ऑफ थिंग   (IoT),  आर्टिफिसल इंटेलिजन्स (AI), क्लाउड कॉम्प्युटिंग, 3D प्रिंटिंग आणि रोबोटिक्स सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक त्यात असेल.
ह्या एक्स्पो मध्ये अभियांत्रिकी आणि त्यासंलग्न उद्योगांसाठी संभाव्य खरेदीदार आणि पुरवठादारांशी संपर्क साधण्यासाठी B2B मॅच मेकिंगच्या संधी ह्या औद्योगिक प्रदर्शनातुन उपलब्ध होतील.काही देशांचे दूत व वाणिज्य अधिकारी तसेच जर्मनी, इंडोनेशिया, फ्रांस, कोरिया, मॉरिशस तसेच अनेक देशांचे प्रतिनिधी व कंपन्या सहभागी होणार आहेत. या तीन दिवसीय मेगा एक्स्पोमध्ये अभियांत्रिकी व केमिकल क्षेत्रातील  सुमारे  २०० पेक्षा अधिक स्टॉल्स असतील आणि २०,०००पेक्षा अधिक उद्योजक,व्यावसायिक भेट देतील असा आयोजकांचा  अनुमान आहे. 
महाइंडेक्स मध्ये  विविध विषयांवर परिषदांचे आयोजन करण्यात येणार असून उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ विचारवंत ह्याचे नेतृत्व करतील.एमएसएमई साठी एक वेगळे व्यासपीठ तयार करणे, सार्वजनिक उद्योग तसेच उद्योग क्षेत्रातील मोठ्या इंडस्ट्रीयल प्लेयर्सना  जोडणे, परस्पर सहकार्य करण्यास त्यांना सक्षम करणे व नवीन व्यवसायाच्या संधींचा शोध घेण्यास सहाय्य करणे असा ह्या प्रदर्शनाचा उद्देश आहे. ह्या प्रदर्शनात मोठ्या संख्येने उद्योजक, प्रदर्शक आणि उद्योग तज्ञ उपस्थित राहतील. सदर मेगा एक्स्पो हे एका वेगळ्या उपक्रमांचे केंद्र असेल, ज्यामध्ये व्यावसायिच्या नवीन संधी, नवीन सौदे केले जातील, नवीन उत्पादने लाँच केली जातील आणि  सामायिक ज्ञानाचे आदानप्रदान केले जाईल व्यवसाय वाढीसाठी नवीन मार्ग मिळतील.
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्योग मंत्री उदय सामंत यांची आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत भेट घेतली ह्यात  चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोसिएशन्सचे अध्यक्ष संदीप पारीख, राष्ट्रीय कोसिआचे मानद महासचिव निनाद जयवंत,टिसाचे उपाध्यक्ष भावेश मारू उपस्थित होते. हे औद्योगिक प्रदर्शन राज्याच्या  रोजगार निर्मितीत , आर्थिक वाढीत आणि उद्योग विकासात महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी भेटीत व्यक्त केला.ह्या प्रदर्शनात शासनाचा सहभाग असून  महाराष्ट्र शासनातर्फे  महाइंडेक्स साठी पूर्ण पाठिंबा देण्याच्या सूचना संबंधित विभागास शासनातर्फे देण्यात आल्या आहेत .
महाइंडेक्स मध्ये जास्तीत जास्त उद्योजकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. स्टॉल बुकिंगसाठी ७७१८८७९२५४ येथे संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

 19,687 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.