नवतरुण सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, डोंबिवलीतर्फे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा

सुधागड तालुक्यातील रहिवाशांच्या विकासासाठी झटणार्‍या डोंबिवलीतील नवतरुण सुधागड तालुका रहिवासी सेवा संघाच्यावतीने समाजोपयोगी शैक्षणिक, सामाजिक व क्रीडा विषयक उपक्रम राबविले जातात.

डोंबिवली : डोंबिवली शहरात कार्यरत असलेल्या नवतरुण सुधागड तालुका रहिवासी सेवा संघाच्यावतीने अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर सुधागड तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धांचे आयोजन शनिवार, २२ एप्रिल रोजी डोंबिवलीतील लोढा हेरिटेज मैदान, भोपर रोड, देसलेपाडा, डोंबिवली (पूर्व) येथे दुपारी २ वाजता करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी सुधागड, ठाणे, मुंबई, पुणे, व कल्याण-डोंबिवलीमध्ये वास्तव्यास असलेल्या सुधागड तालुकावासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष जयेश ठाकूर यांनी केले आहे.
सुधागड तालुक्यातील रहिवाशांच्या विकासासाठी झटणार्‍या डोंबिवलीतील नवतरुण सुधागड तालुका रहिवासी सेवा संघाच्यावतीने समाजोपयोगी शैक्षणिक, सामाजिक व क्रीडा विषयक उपक्रम राबविले जातात. त्यात कल्याण-डोंबिवली परिसरात राहणारे रहिवासी मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. यंदा अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सुधागड तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धाचे आयोजन केले असून या स्पर्धांसाठी संस्थेचे अध्यक्ष जयेश ठाकूर, कार्याध्यक्ष राजू शेडगे, सुरेश चव्हाण, उपाध्यक्ष महेश अधिकारी, वामन कडू, सरचिटणीस नामदेव महाले, चिटणीस जगदिश म्हस्के, खजिनदार अमोल पालांडे, उपखजिनदार निखील ढीसे, हिशेब तपासनीस जनार्दन बेलोसे, गोविंद शिंदे, प्रमुख सल्लागार सचिन ठाकूर, दिलीप कोंडे, चंद्रकांत बेलोसे, दत्तात्रय लहाने, उल्हास पालांडे, गोपाळ साठे, विनोद ससर, मगेंश चरवट, महेश चव्हाण, कार्यवाहक संतोष जाधव, पंढरीनाथ यादव, रोहन चव्हाण, शिक्षण समितीप्रमुख रवि इंदुलकर, विजय पवार, क्रीडा समिती प्रमुख शंकेश ससर, संदिप मोरे,नितीन निमुतकर, हरेश अधिकारी, नरेश आंगे्र, हरेश जाधव, राकेश कडू यांच्यासह सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत. सुधागड तालुक्यातील १६ संघाचा समावेश असलेल्या या स्पर्धेसाठी अनेक देणगीदार व सुधागडवासियांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेने केले आहे.

 90,239 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.