शार्वी सावेला विजेतेपद

३२ महिला क्रिकेटपटूंचा सहभाग लाभलेल्या स्पर्धेत यजमान संघाची यष्टीरक्षक प्रतीक्षा पोवार आणि दहिसर स्पोर्ट्स क्लबच्या मुस्कान कनोजियाची सर्वोत्तम क्षेत्ररक्षकासाठी देण्यात येणाऱ्या मोतीराम मोरेकर स्मृती पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

ठाणे : पालघर डहाणू तालुका स्पोर्ट्स क्लबच्या शार्वी सावेने पय्याडे स्पोर्ट्स क्लबच्या तुशी शहाचा आठ धावांनी पराभव करत स्पोर्टींग क्लब कमिटी आयोजित महिलांच्या दुसऱ्या खंडेराव रांगणेकर स्मृती एकेरी विकेट क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
सेंट्रल मैदानात रंगलेल्या स्पर्धेची निर्णायक लढत चुरशीची ठरली. सहा चेंडूंच्या एका षटकात शार्वीने बिनबाद ११ धावा केल्या. उत्तरादाखल तुशीने एका षटकात १२ धावा केल्या. पण, यादरम्यान तुशी दोन वेळा बाद झाल्याने तिच्या एकूण धावसंख्येतून आठ धावा वजा करण्यात आल्या. त्याआधी झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत शार्वीने व्हिक्टरी क्रिकेट क्लबच्या अलिना मुल्लाचा १३-१२ असा एका धावेने पराभव केला होता. अन्य लढतीत तुशीने पालघर डहाणू तालुका स्पोर्ट्स क्लबच्या ययाती गावंडवर १५-१२ असा विजय मिळवला होता.
तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत अलिना मुल्लाने ययाती गावंडवर २७-२५ अशी दोन धावांनी सरशी मिळवली होती. सुमारे ३२ महिला क्रिकेटपटूंचा सहभाग लाभलेल्या स्पर्धेत यजमान संघाची यष्टीरक्षक प्रतीक्षा पोवार आणि दहिसर स्पोर्ट्स क्लबच्या मुस्कान कनोजियाची सर्वोत्तम क्षेत्ररक्षकासाठी देण्यात येणाऱ्या मोतीराम मोरेकर स्मृती पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

 36,646 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.