भारत, इंग्लंड, बेलारूस संघाचे विजय

सहावी विश्वकरंडक रोलबॉल स्पर्धा : लॅटव्हिया, न्यूझीलंड संघ पराभूत

पुणे : महिला गटात भारताने लॅटव्हिया संघावर तर पुरुष गटातून इंग्लंडने न्यूझीलंड संघाला पराभूत करताना सहाव्या विश्वकरंडक रोलबॉल स्पर्धेतील आपली आगेकूच कायम राखली .
म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती स्टेडीयम येथे सुरु असलेल्या स्पर्धेच्या महिला गटात भारताने लॅटव्हिया संघावर ७-० असा विजय साकारला. मध्यंतराला भारताने ५-० अशी आघाडी घेतली होती. भारताकडून सुहानी सिंगने ३ (१.२५, ७.२०, ९.०९ मिनिटे), पूजा चौधरीने २ (३०.३९ व ३५.३४ मिनिटे) तर इशिका शर्मा (११.२५ मिनिटे) व कर्णधार एस सुस्मिथा (१८.५९ मिनिटे) यांनी प्रत्येकी एक गोल केला. लॅटव्हिया संघाकडून इव्हिटा कृमिना व झेन डायबे यांनी सुरेख खेळ केला परंतू त्यांना गोल करण्यात यश मिळाले नाही.
पुरुष गटाच्या लढतीमध्ये इंग्लंड संघाने न्यूझीलंड संघाला ९-३ असे पराभूत करताना स्पर्धेतील आगेकूच कायम राखली. इंग्लंड संघाने मध्यंतराला ५-१ अशी आघाडी घेतली होती. इंग्लंड संघाकडून कैलास्वाम विष्णू (१४.३७, १७.०३ व ३८.२९ मिनिटे) व वैभव गुलाटी (१५.३०, १७.४१ व ३४.२२ मिनिटे) यांनी प्रत्येकी ३ तर सुगलानी अजय (२०.२९ मिनिटे), रोहित हल्दानिया (३२.४०) व फिन स्मिथ (८.२०) यांनी प्रत्येकी १ गोल केला. न्यूझीलंड संघाकडून फ्रोस्ट जोसिहने ३ (१९.५५, २२.५८ व २४.५५ मिनिटे) गोल करताना चांगली लढत दिली.
सकाळच्या सत्रात झालेल्या पुरुष गटाच्या लढतीमध्ये भारताने युगांडा संघाला १२-३ असे पराभूत करताना स्पर्धेतील विजयी मालिका कायम राखली. भारताने मध्यंतराला ६-२ अशी आघाडी घेतली होती. भारताकडून श्रीकांत साहूने ३ (२३.०३, ३३.५७ व ३८.०८ मिनिटे), विकी सैनी (२.१३, ३०.४० मिनिटे), हर्षल घुगे (११.३५, १७.३५ मिनिटे) व गुरुवचन सिंग (१५.४०, २२.०६ मिनिटे) यांनी प्रत्येकी २ गोल केले. आकाश गणेशवाडे (६.५७ मिनिटे), मिहीर साने (१३.०९ मिनिटे) व सचिन सैनी (३५.५१ मिनिटे) यांनी प्रत्येकी १ गोल करताना सुरेख साथ दिली. युगांडा संघाकडून मुगोया डेरिकने २ (१०.१४ व ११.१८ मिनिटे) तर क्लोगुलासी जोसेफने १ (३५.२३) गोल करताना लढत देण्याचा प्रयत्न केला.
पुरुष गटात बेलारूस संघाने सौदी अरेबिया संघाला ३-२ असे पराभूत केले. मध्यंतराला दोन्ही संघांनी १-१ अशी बरोबरी राखली होती. बेलारूस संघाकडून झिनचेन्को व्हिक्टर (३.२७), कुर्क अंडेरी (२९.१६) व सिडोर क्रेत्स्की (३६.००) यांनी प्रत्येकी एक गोल करताना संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सौदी अरेबिया संघाकडून अल्जरानी मोहम्मद एचने २ (११.२९ व २५.१५ मिनिटे) २ गोल करताना लढत दिली.
महिला गटात अतीतटीच्या लढतीत भारताने पोलंड संघाला २-१ असे पराभूत करताना विजय साकारला. मध्यंतराला दोन्ही संघ गोलशून्य बरोबरीत होते. मध्यंतरानंतर भारताच्या श्रुती भगत (२५.४०) व इशिका शर्मा (३३.२५) गोल करताना संघाचा विजय साकारला. पोलंड संघाकडून सायनोविक मारियाने १ (२३.४०) गोल केला.

 149 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.