ठाण्यात विशेष मुलांचा ग्रीष्मोत्सव उत्साहात

  जागृती पालक संस्थेतर्फे आयोजित ‘ग्रीष्मोत्सवात’  कलात्मक गुणांना मिळाला वाव

ठाणे: विशेष मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी झटणार्‍या ठाण्यातील जागृती पालक संस्थेतर्फे आयोजित ‘ग्रीष्मोत्सव’ मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणार्‍या या दोन दिवसीय कार्यशाळेत टाय अ‍ॅण्ड डाय, मार्बल पेंटिंग, वॉल पेंटिंग, ओरिगामी, कागदी लगद्यापासून वस्तुनिर्मिती, माती काम, नाट्य व कला प्रकाराचे प्रशिक्षण देण्यात आले. सर्वसामान्य मुलांप्रमाणे विशेष मुलांना उन्हाळी सुट्ट्यांमध्ये हक्काचा असलेला ग्रीष्मोत्सवसारखा समर कॅम्प अनुभवता आल्याने या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
ठाण्याच्या प्रादेशिक मनोरुग्णालयाजवळ असलेल्या जुन्या ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या आवारात जागृती पालक संस्था विशेष मुलांसाठी काम करते. या संस्थेच्या माध्यमातून दोन दिवसीय ग्रीष्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता. ठाणे पालिकेच्या परबवाडी येथील स्व. दादा कोंडके एमफी थिएटर येथे पार पडलेल्या या ग्रीष्मोत्सवात जिल्ह्यातील एम.बी.ए. फाऊंडेशन, चैतन्य, स्नेहालय, विश्वास चॅरिटेबल ट्रस्ट, जिव्हाळा ट्रस्ट आणि धर्मवीर आनंद दिघे विशेष मुलांची जिद्द शाळा येथील मुलामुलींनी सहभाग नोंदवला. या कार्यशाळेत विविध कला शिकताना विशेष मुलांच्या चेहर्‍यावरही आनंद ओसंडून वाहात होता. या अनोख्या महोत्सवाचे उद्घाटन नायकेम केमिकल कंपनीचे मुख्य अधिकारी, उद्योजक राजन राजे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा अ‍ॅड. माधवी नाईक, एचडीएफसी बँक मॅनेजर शर्मिष्ठा नवले, माजी उपमहापौर मुकेश मोकाशी, भाजप पोखरण मंडळ अध्यक्ष संतोष जयस्वाल, जागृती पालक संस्थेचे अध्यक्ष सतीश धुरत, कार्यक्रमाच्या व्यवस्थापिका नॅन्सी सेठना आदी उपस्थित होते.
स्वयंसेवकांचा गौरव
ग्रीष्मोत्सवाच्या सांगता समारोप कार्यक्रमासाठी मिती क्रिएशनच्या अध्यक्षा व सूत्रसंचालिका उत्तरा मोने, परिवार सह्याद्री संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम बेर्डे, भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव अ‍ॅड. संदीप लेले, अर्चना पाटील, प्लॅनेट फाऊंडेशनचे अध्यक्ष सचिन पंजाबी, संस्थेचे  सल्लागार श्रीकांत काळे, ज्येष्ठ छायाचिञकार प्रवीण देशपांडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते कार्यशाळेत उपस्थित असलेले विशेष तज्ञ आणि स्वयंसेवकांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

 34,213 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.