विहंगची विजयी घौडदौड कायम

जुहू विलेपार्ले जिमखान्याचे १२९ धावांचे आव्हान विहंग ग्रुप क्रिकेट क्लबने १८.२ षटकात १३० धावा करत पार करत आपल्या खात्यात आणखी एक विजय जमा केला.

मुंबई : विहंग ग्रुप क्रिकेट क्लबने जुहू विलेपार्ले जिमखान्याचा सात विकेट्सनी पराभव करत कोकण युवा प्रतीष्ठान आयोजित मुंबई चॅम्पियनशिप टी २० लीग क्रिकेट स्पर्धेतील आपली विजयी घौडदौड कायम राखली आहे. जुहू विलेपार्ले जिमखान्याचे १२९ धावांचे आव्हान विहंग ग्रुप क्रिकेट क्लबने १८.२ षटकात १३० धावा करत पार करत आपल्या खात्यात आणखी एक विजय जमा केला.
जुहू विलेपार्ले जिमखान्याने २० षटकात १२९ धावांचा पल्ला गाठला तो मधल्या फळीतल्या फलंदाजांच्या जोरावर.सिद्दीद तिवारीने ४२ धावासह संघाच्या धावसंख्येत महत्वाचे योगदान दिले. त्यापाठोपाठ अब्बास कराचीवालाने २४, यशराजने २०, विजय राणेने १९ आणि वैभव सजांना १८ धावांची संघाच्या एकूण धावसंख्येत भर टाकली. अनुप सिंगने दोन तर कासीम मलिक आणि प्रयाग कुमारने प्रत्येकी एक विकेट मिळवली.
उत्तरादाखल विहंग ग्रुप क्रिकेट क्लबने ३ विकेट्सच्या मोबदल्यात १३० धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केले. अग्नी चोप्राने ३९, महबूब शेखने ३२ आणि अमन फारुकीने १४ धावा केल्या. अब्बास कराचीवाला, यशराज आणि शुभम शेवाळेने प्रत्येकी एक विकेट मिळवली.
संक्षिप्त धावफलक : जुहू विलेपार्ले जिमखाना : २० षटकात ५ बाद १२९ ( सिद्दीद तिवारी ४२, अब्बास कराचीवाला २४, यशराज २०, विराज राणे १९, वैभव सजाना १८, अनुप सिंग ४-१७-२, कासीम मलिक ३-२४-१, प्रयाग कुमार ४-१५-१) पराभुत विरुद्ध विहंग ग्रुप क्रिकेट क्लब : १८.२ षटकात ३ बाद १३० ( अग्नी चोप्रा ३९, महबूब शेख ३२, अमन फारुकी १४, अब्बास कराचीवाला ४-२४-१, यशराज १-६-१, शुभम शेवाळे ३-२०-१).

 129 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.