“कॉलरेग्ज ऍज आय अँडरस्टँड” हे कॅडेट्सना केंद्रस्थानी ठेवून जयराज नाखवा यांनी लिहिलेले पुस्तक जगभरात गाजले आहे. निवृत्तीनंतर त्यांनी मार्गदर्शन केलेले अनेक युवा कॅडेट आज मर्चंट नेव्हीत कार्यरत आहेत.
ठाणे : सुमारे साडेपाच दशकांच्या १९६९ ते २०२३ अशा कालावधीत कॅडेट ते कॅप्टन आणि नंतर शिक्षक ते प्रशिक्षक असा प्रवास करणाऱ्या ठाणेकर कॅप्टन जयराज नाखवा यांना ग्लोबल मेरिटाईम एज्युकेशन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटस असोसिएशन तर्फे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रविवारी झालेल्या एका कार्यक्रमात डायरेक्टर जनरल ऑफ शिपिंग (निवृत्त) दिपक शेट्टी यांच्या हस्ते हा पुरस्कार जयराज नाखवा यांना प्रदान करण्यात आला.
कॅडेट, थर्ड ऑफिसर, चिफ ऑफिसर व कॅप्टन अशी यशाची चढती कमान ठेवणाऱ्या जयराज नाखवा यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. मर्चंट नेव्हीत कारकीर्द घडवण्याचे ध्येय बाळगणाऱ्या जयराज नाखवा यांना शालेय जीवनात मो.ह.विद्यालयात गुरुवर्य स.वी.कुलकर्णी आणि नंतर मेजर बापट यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर कॅप्टन जयराज नाखवा म्हणाले, आज वयाच्या ७२ व्या वर्षीही माझ्यातील कॅडेट जागृत आहे. तेच माझ्या यशाचे गमक आहे. या क्षेत्रात कारकीर्द घडणवण्यासाठी युवकांसाठी भरपूर संधी आहेत. मार्गदर्शक म्हणून त्यात माझा सहभाग असेलच. “कॉलरेग्ज ऍज आय अँडरस्टँड” हे कॅडेट्सना केंद्रस्थानी ठेवून जयराज नाखवा यांनी लिहिलेले पुस्तक जगभरात गाजले आहे. निवृत्तीनंतर त्यांनी मार्गदर्शन केलेले अनेक युवा कॅडेट आज मर्चंट नेव्हीत कार्यरत आहेत.
4,983 total views, 1 views today